मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री-निर्माती कंगना रणौतने बाहुबलीच्या यशानंतर दक्षिणेकडील चित्रपट कलाकारांना मिळालेले प्रचंड यश अधोरेखीत केले आहे. अभिनेत्री कंगनाने दाक्षिणात्य ताऱ्यांच्या उदयाचे श्रेय त्यांच्या "भारतीय संस्कृतीत खोलवर रुजण्याला"ला दिले आहे.
रविवारी कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर दक्षिण चित्रपटांच्या यशाबद्दल आणि देशभरातील कलाकारांच्या लोकप्रियतेबद्दल तिचे विचार शेअर केले. अल्लू अर्जुन आणि केजीएफ स्टार यशचे फोटो शेअर करत कंगनाने लिहिले, "दक्षिणेतील आशय आणि सुपरस्टार्स असे का आहेत याची काही कारणे...1) ते भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेले आहेत, 2) त्यांचे कुटुंब आणि नातेसंबंध परंपरागत आहेत. पाश्चिमात्य नाही, 3) त्यांची व्यावसायिकता आणि आवड अतुलनीय आहे."
हिंदी चित्रपटसृष्टीचा सतत समाचार घेणार्या क्वीन अभिनेत्री कंगनाने असेही म्हटले की, दक्षिणेकडील कलाकारांनी "भ्रष्ट होऊ देण्यास बॉलिवुडला संमती देऊ नये."
विशेष म्हणजे, कंगनाचा शेवटचा चित्रपट 'थलायवी' हा तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांचा बायोपिक होता. कंगनाच्या आगामी चित्रपटांच्या लाइनअपमध्ये 'धाकड', 'तेजस' आणि 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लिजेंड ऑफ दिड्डा' यांचा समावेश आहे.
हेही वाचा - सामाजिक कार्य आमच्या रक्तातच आहे : सोनू सूदची प्रतिक्रिया