मुंबई - चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे आत्तापर्यंत बऱ्याच नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या व्हायरसची जगभरात दहशत पसरली आहे. या व्हायरसचा संसर्ग झपाट्याने देशात पसरत आहे. या व्हायरसपासून वाचण्यासाठी जगभरात आव्हान केले जात असताना बॉलिवूडच्या एका अभिनेत्याने मात्र, भारतात या व्हायरसची लागण व्हावी, असे खळबळजनक ट्विट केले आहे.
बॉलिवूड अभिनेता कमाल आर. खान हा नेहमीच त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे किंवा ट्विटमुळे चर्चेत असतो. तो नेहमी काही ना काही ट्विट शेअर करत असतो, ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटेल. आताही त्याने कोरोना व्हायरसला घेऊन ट्विट केल्याने तो चर्चेत आला आहे. मात्र, हे ट्विट त्याने नेमके का केले, हे जाणून घेऊयात.
हेही वाचा -फोटोग्राफर्सनी 'वहिनी' म्हणताच जेनेलियाच्या चेहऱ्यावर खुलले हसू, पाहा व्हिडिओ
'कोरोना वायरस लवकरात लवकर भारतात यावा, अशी प्रार्थना मी देवाकडे करतो. असे झाल्यास देशातील लोक हिंदू, मुस्लिम, शिख, ख्रिश्चन असे धार्मिक मतभेद सोडून एकत्र येतील. तसेच, कोरोना व्हायरसला मिळून लढा देतील', असे कमाल आर. खानने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.
-
I pray to GOD for the #caronavirusoutbreak in India as soon as possible. May be, we all Hindu Muslim Sikh Christians become brothers again to fight against #coronavirus!
— KRK (@kamaalrkhan) February 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I pray to GOD for the #caronavirusoutbreak in India as soon as possible. May be, we all Hindu Muslim Sikh Christians become brothers again to fight against #coronavirus!
— KRK (@kamaalrkhan) February 29, 2020I pray to GOD for the #caronavirusoutbreak in India as soon as possible. May be, we all Hindu Muslim Sikh Christians become brothers again to fight against #coronavirus!
— KRK (@kamaalrkhan) February 29, 2020
कमाल खानच्या या ट्विटमागची भावना जरी सर्व धर्मांनी एकत्र यावं, अशी असली तरीही भारताला कोरोनाची लागण व्हावी, या विधानावर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. त्याच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकाही केली आहे.
हेही वाचा -दलजीत दोसांझच्या 'त्या' फोटोवर इवांका ट्रम्पची मजेशीर प्रतिक्रिया