ETV Bharat / sitara

कल्की कोयचलिनच्या आयुष्यात नव्या आनंदाला भरती - Dev D

कल्की कोयचलिनने नव्या नात्याचा खुलासा करीत आपल्या नव्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केलाय.

कल्की कोयचलिन
author img

By

Published : Sep 4, 2019, 8:59 AM IST

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोयचलिन सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. ही चर्चा तिच्या नव्या सिनेमाची नाही, तर ती आहे तिच्या नव्या बॉयफ्रेंडची. गेली १० वर्षे ती बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून कार्यरत आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर मित्रासोबतचा फोटो शेअर करुन या नव्या नात्याला दुजोरा दिलाय.

तिने शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''मी जेव्हा आपल्या केवमॅनसोबत (गुहेत राहणारा व्यक्ती) असते तेव्हा मला प्रत्येक दिवस संडे असल्यासारखा वाटतो.'' तो व्यक्ती कोण आहे याचा खुलासा तिने केलेला नाही. मात्र ती खूश दिसत असून आपल्या बॉयफ्रेंडसोबत सुमुद्र किनारी किस करताना दिसत आहे.

कल्की कोयचलिनने २००९ मध्ये 'देव डी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर २०११ मध्ये ती दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत बोहल्यावर चढली होती. मात्र त्यांचा संसार केवळ ४ वर्षेचं टिकू शकला. २०१५ मध्ये त्यांचा काडीमोड झाला. त्यानंतर अनुरागच्या आयुष्यात दुसरी स्त्री आली मात्र कल्किचे नाव कोणाशीही जोडले गेले नव्हते. घटस्फोटानंतरही दोघांमधील मैत्री कायम आहे. कल्की सेक्रेड गेम्सच्या पहिल्या भागात झळकली होती. आता तिच्या आयुष्यात तिला आवडणारा व्यक्ती आलाय.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.