ETV Bharat / sitara

जून : नैराश्यावर संवादातून सहज मात करता येते हे दाखविणारा चित्रपट - Neha Pendse and Siddharth in June

चित्रपटाचे शीर्षक - जून दिग्दर्शन - सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती प्रदर्शन - 'प्लॅनेट मराठी ओटीटी' 'वर प्रदर्शित कालावधी - 1 तास 33 मिनीटे

June movie review
जून मुव्ही रिव्ह्यू
author img

By

Published : Jul 13, 2021, 8:50 PM IST

Updated : Jul 14, 2021, 8:24 AM IST

कोरोनाकाळात थिएटर्स बंद असल्यामुळे प्रेक्षकांना त्याचबरोबर कलाकारांनादेखील ओटीटी प्लॅटफॉर्म्सची मदत झाली. आता प्लॅनेट मराठीच्या निमित्ताने पहिला वहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांना उपलब्ध झाला आहे. याच पहिल्यावहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच जून हा चित्रपट प्रदर्शित झाला.

अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि अभिनेत्री नेहा पेंडसे या दोघांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आहे. सहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय तर निखिल महाजन यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटाची निर्मिती सुप्री अॅडव्हर्टायझिंग अँड एंटरटेन्मेंट प्रा.लि., ब्लू-ड्रॉप फिल्म्सने केली आहे. तर शाल्मली खोलगडेने या चित्रपटाच्या माध्यमातून संगीत दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे.

June movie review
जून मुव्ही रिव्ह्यू

चित्रपटाची कथा -

नेहाच्या (नेहा पेंडसे) आयुष्यात एक अनपेक्षित अन् दुर्दैवी घटना घडते. जे घडतं त्याचा तिला मोठा मानसिक धक्का बसतो. त्या घटनेला ती स्वत:च जबाबदार आहे, दोषी आहे असं मानते. म्हणूनच ती तिचा नवरा अभिजीतपासून (जितेंद्र जोशी) वेगळी होते. साधारणत: एका वर्षापासून ते संपर्कात असतात. मात्र, तरी वेगळे असतात.

तर दुसरीकडे नील (सिद्धार्थ मेनन) पुण्याला इंजिनिअरिंग शिकायला होता. मात्र, त्यात अनुत्तीर्ण झाल्यामुळे तो घरी औरंगाबादला परत येतो. पुण्याला असताना त्याचा रुममेट असलेला रामेश्वर परीक्षेच्या आधी आत्महत्या करतो. रामेश्वरच्या आत्महत्येनंतर त्याने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये जे सापडतं ते त्याहून धक्कादायक असतं. अर्थात नीलला जे वाटतं ते त्या सुसाइड नोटमध्ये नसतं. मात्र, तरीसुद्धा नीलला रामेश्वरच्या आत्महत्येचा मोठा धक्का बसतो. त्या धक्क्यातूनच तो परीक्षेत नापास होतो. रामेश्वरच्या जाण्याने नील पूर्ण तुटतो. कॉलेजमध्ये झालेलं रॅगिंग आणि नीलच्या बोलण्याचा परिणाम रामेश्वरवर झाला आणि त्यातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असे वाटून निल स्वतःला दोष देऊ लागतो. इतकंच नाही तर घरी औरंगाबादला आल्यानंतरही तो या धक्क्यातून सावरताना दिसत नाही. घरी आल्यावर त्याचं आपल्या गर्लफ्रेंड निक्की (रेशम श्रीवर्धनकर) हिच्यासोबतसुद्धा वागणं फार वेगळं असतं. निक्कीचं नीलवर प्रेम असतं. मात्र, नीलला आलेल्या नैराश्याचा त्यांच्या नात्यावर झालेला परिणाम दिसून येतो.

June movie review
जून मुव्ही रिव्ह्यू

नील औरंगाबादला आल्यावर आपला मुलगा अनुत्तीर्ण झालाय हे सांगण्याची हिंम्मत त्यांच्या वडिलांमध्ये नसते. कर्ज काढून शिकवायला पाठवलेला मुलगा घरी अनुत्तीर्ण होऊन येतो, हे समाजाला सांगणं त्यांना कमीपणाचं वाटतं. त्यामुळे ते त्याला पुण्याला पुन्हा परत जायचा सल्ला देतात. मात्र, त्याचं मन इंजिनिअरिंगमध्ये आणि सध्यस्थितीमध्ये पुण्यात रमत नसल्यामुळे तो पुण्यात जायला नकार देतो आणि बी. कॉम करण्याची इच्छा वडिलांसमोर तो व्यक्त करतो. मात्र, तरी ते त्याला विरोध करतात. 'आवडलं नाही म्हणून सोडणं हा पर्याय नसतो', अशी त्यांची मानसिकता असते. अशा वेळी 'कर रहा हूं कुछ और करना चाहता हूं कुछ और...' अशी त्याची अवस्था असते. समाजातील सर्वसाधारण कुटुंबामध्ये महत्त्वकांक्षा बाळगून मुलांना शिकवतात. मात्र तो ती अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्याने त्याचे हसू होईल किंवा आपली नामुष्की होईल ही भिती असते. त्याचं अचूक वर्णन सिनेमात पाहायला मिळतात.

याचदरम्यान, नेहा पुण्याहून औरंगाबादला येते. नील राहत असलेल्या परिसरातच ती राहत असते. तिथे आल्यावर आपसूकच तिची नीलशी भेट होते. नेहाला आपल्या पती अभिजितबद्दल जाणून घ्यायचं असतं. तो कुठे मोठा झालाय, कुठे क्रिकेट खेळायचा, काय करायचा हे सर्व जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे ती नीलला याबाबत मदत मागते. यानंतर ते दोघं एकमेकांचे खूप चांगले मित्र होतात. सोबतच औरंगाबाद शहर फिरवण्याबाबत विनंती करते आणि मग सुरू होतो दोघांच्या औरंगाबाद भ्रमणाचा जखमेवर, वेदनांवर फुंकर घालणारा प्रवास.

ते दोघं चित्रपटाला जातात. हिंडतात अगदी दिवसभर सोबत. याच दरम्यान ते एकमेकांच्या जवळ येतात. एकमेकांचे खूप चांगले मित्र होतात. यावेळी मात्र, त्यांच्यात ज्याप्रकारचा संवाद होतो, तो आपल्याच प्रश्नांशी निगडित आहे, असा वाटतो. या भटकंतीमध्ये ती दोघं एकमेकांजवळ मनमोकळेपणांनं व्यक्त होतात. तो पुण्याहून अनुत्तीर्ण होऊन कसा औरंगाबादला आला तर तीसुद्धा पुण्याहून औरंगाबादला येण्याचं कारण काय? हे सांगते. तिच्या आयुष्यात घडलेल्या त्या प्रसंगाने ती फार खचते. तिच्याकडून झालेली ती चूक असो किंवा नसो त्या चुकीसाठी ती स्वत:ला जबाबदार ठरवते. दोघंही जण एकमेकांजवळ व्यक्त होतात. ती त्याची समजूत काढते. ज्याप्रकारे, ज्या परिस्थितीत ते दोघं एकमेकांचे मित्र म्हणून व्यक्त होतात, तिथेच त्यांचा आपापल्या दिशेने मुक्त होण्याच्या एका नवीन प्रवासाला सुरुवात होते. जून चित्रपटाच्या एकुणच प्रवासात नीलचा बालपणीच्या मित्राची साथ बहूमूल्य आहे. नीलवर असलेला ताण हलका करण्यास त्याचा एकुलत्या एक मित्राची भूमिका महत्त्त्वाची ठरली आहे.

अभिजितच्या पूर्वायुष्याचा शोध घेण्यासाठी औरंगाबादेत आलेली नेहा पुन्हा अभिजितकडे जाते का, की नीलच्या सहवासात ती रमते हे प्रत्यक्ष पाहाणेच एक वेगळा अनुभव आहे. सिनेमाला जून हे नाव निश्चित करण्यामागचं कारण म्हणजे जूनची सुरूवात ही ऋतू बदलाची असते. तापलेल्या वातावरणातून एक सुखद गारव्याकडे जाण्याचा काळ असतो. तोच आशय इथे घेतला आहे.

June movie review
जून मुव्ही रिव्ह्यू

चित्रपटाचं मूळ -

जून हा चित्रपट काय? तर समाजात निर्माण झालेली मात्र, अजूनही बऱ्याच प्रमाणात तशाच असलेल्या समाजाच्या मानसिकतेचं, समाजव्यवस्थेचं चित्रण म्हणजे जून. संवाद आणि संयमातून प्रश्न सुटतात, आनंद मिळतो, याचं उदाहरण म्हणजे जून. रामेश्वरची आत्महत्येचं कारण समाजातील परिस्थितीचं दर्शन घडवतं. सिद्धार्थ मेनन आणि नेहा पेंडसे या दोघांनी छान अभिनय केलाय. मैत्री आणि प्रेमाच्या पलीकडचं असं एक जवळचं, आपुलकीचं, एकमेकांना आधार देणार नातं त्या दोघांमध्ये दाखवलंय. नेहाचा पती अभिजितच्या भूमिकेत जितेंद्र जोशीची भूमिका छोटी असली तरी त्याने त्याच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. गायिका म्हणून परिचीत असलेल्या शाल्मली खोलगडेने या चित्रपटाच्या माध्यमातून संगीत दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे. चित्रपटाचे संगीत प्रसंगानुरुप झाले असून शाल्मलीच्या आवाजातील 'हा वारा' हे गाणंही कर्णमधूर झाले आहे.

जून महिन्यात पावसाळयाच्या आगमनाने जसा निसर्ग बहरतो, तशीच मनाची मरगळही दूर करण्याचा प्रयत्न 'जून' मध्ये करण्यात आला आहे. एखाद्या जखमेवर कोणी हळुवार फुंकर मारली, तर ती जखम भरून येण्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. अशीच हळुवार फुंकर कोणी आपल्या मनाच्या जखमेवर मारली तर त्यावेळी आपल्या मनावरील मळभ नक्कीच दूर होईल. 'जून' चित्रपट म्हणजे अनोखी प्रेमकहाणी असलेला, मैत्रीच्या पलीकडचे नाते उलगडणारा हा चित्रपट आहे.

Last Updated : Jul 14, 2021, 8:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.