मुंबई - बॉलिवूड कलाकार आपल्या अभिनयासोबत आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठीही लोकप्रिय असतात. बरेच कलाकार आपल्या आवडीनिवडी जपत असतात. यामध्ये अभिनेता जॉन अब्राहम देखील आहे. जॉनला बाईकचं प्रचंड वेड आहे. आपल्या वेगवेगळ्या बाईकचा एक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
यामध्ये कावासाकी निन्जा ZX-14 R (Kawasaki Ninja ZX-14 R) पासून ते एप्रीलिया RSV4 RF (Aprilia RSV4 RF) अशा महागड्या गाड्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त जॉनने नुकतीच यामाहाची the YFZ-R1 ही बाइक घेतली आहे. तसेच व्हिडीओमध्ये Ducati Panigale V4, MV Agusta F3 800, वी-मॅक्स या स्टायलिश गाड्या देखी पाहायला मिळतात.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">