मुंबई - ‘जॉबलेस’ तरुणाच्या चुकीच्या निर्णयातून आयुष्य कसे उद्ध्वस्त होते हे ‘जॅाबलेस’ मधून केलेय अधोरेखित! कोरोना विषाणूचा आघात झाल्यावर संपूर्ण जगच थांबलं होतं. देशाच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या होत्या. सर्व व्यवसाय ठप्प झाल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अजूनही ती परिस्थिती आटोक्यात आलेली नाहीये. कोरोना काळात अनेक जण ‘जॉबलेस’ झाले आणि जॉबलेस झालेल्या व्यक्तींच्या मानसिक अवस्थेवर आधारित एक वेब सिरीज आलीय जिचे नावसुद्धा ‘जॉबलेस’ आहे. या एका चुकीच्या निर्णयातून आयुष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते, हे दर्शविणारी ही वेबसिरीज लवकरच 'प्लॅनेट मराठी ओटीटी' वर येत आहे.
‘जॉबलेस’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला - अक्षय बर्दापूरकर
माणसाची मानसिक स्थिती ढासळू लागते आणि पैसे कमावण्याच्या नादात, उतावळेपणात अनेकदा चुकीचा निर्णयही घेतला जातो. 'जॉबलेस' या वेबसिरीज मध्ये सुव्रत जोशी, पुष्कर श्रोत्री प्रमुख भूमिकेत असून निरंजन पत्की दिग्दर्शक आहेत.