मुंबई - राजकारणात आपल्या व्यक्तीमत्वाच्या जोरावर राजकीय समीकरणं बदलणारे शरद पवार यांची अमोघ अशी वक्तृत्व शैली सर्वांनीच अनुभवली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान शरद पवार यांचे सातारा येथील भर पावसात केलेले भाषण प्रचंड गाजले. त्यांची एक क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. मात्र, त्याचवेळी अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली होती. या प्रकारावर अभिनेता जितेंद्र जोशी यांने आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या व्हिडिओवर आरे तुरे शब्दात प्रतिक्रिया देणाऱ्या ट्रोलर्सला जितेंद्रने खडे बोल सुनावले आहेत. आपल्या 'दोन स्पेशल' या कार्यक्रमात त्याने आपला संताप व्यक्त केला. या कार्यक्रमात अभिनेता सुबोध भावे आणि सुमीत राघवन यांनी हजेरी लावली होती. त्यांच्याशी संवाद साधताना जितेंद्रने शरद पवार यांना एकेरी बोलणाऱ्या ट्रोलर्सविषयी चीड व्यक्त केली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -'किंग खान'च्या वाढदिवसाचं दुबईत जंगी सेलिब्रेशन, बुर्ज खलिफावर झळकलं नाव
शरद पवार यांनी निवडणुकी दरम्यान सातारा येथे सभा घेतली होती. त्यावेळी अचानक सुरू झालेल्या पावसात त्यांनी न थांबता आपलं भाषण सुरू ठेवलं. त्यांच्या भाषणाची एक छोटी क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. राजकीय वर्तुळातही याची बरीच चर्चा झाली. त्यांच्या या भाषणाची प्रशंसाही झाली. मात्र, काही ट्रोलर्सनी त्यांना अर्वाच्च भाषेत ट्रोलही केलं
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जितेंद्रने व्हिडिओखाली असलेल्या अर्वाच्च भाषेतील प्रतिक्रिया पाहिल्या. त्यामुळे त्याने याबाबत संताप व्यक्त केला. अनेक वर्ष ज्या व्यक्तीने आपला काळ त्या क्षेत्रात घालवला आहे. त्यांच्याविषयी तरी आदराने बोला, असे म्हणत जितेंद्रने ट्रोलर्सला खडे बोल सुनावले.
हेही वाचा -भाईजानसमोर 'खिलाडी'चं तगडं आव्हान, पुढच्या वर्षी 'ईद'च्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार चित्रपट