मुंबई - बॉलिवूडची दिवंगत प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी हिचा आज ५६ वा जन्म दिवस. २०१८ मध्ये तिच्या दुबईत आकस्मात निधनाने कुटुंबीयांसह बॉलिवूडवर शोककळा पसरली होती. तिच्या आठवणीने तिची लेक जान्हवी व्याकुळ झाली आहे. आईचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर करीत तिला आदरांजली वाहिली आहे. आज जान्हवी आईसाठी प्रार्थना करण्यासाठी तिरुपती येथे बालाजी मंदिरात पोहोचली होती.
सोशल मीडियावर तिचा हा तिरुपती दर्शनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ती तिरुपती मंदिरात डोके टेकवताना दिसत आहे. हिरव्या आणि सोनेरी रंगाची पारंपरिक साडी तिने यावेळी परिधान केली होती. या फोटोत तिची मैत्रीणही दिसून येते. या व्हिडिओत जान्हवी मंदिराबाहेर पडून गुडघ्यावर झुकत दर्शन घेताना दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जान्हवीची या मंदिराबद्दल खूप चांगली श्रध्दा आहे. कोणतेही कार्य सुरू करण्याआधी ती या मंदिरात येऊन आशीर्वाद घेते. धडक चित्रपटाला यश लाभावे यासाठी जान्हवी या मंदिरात आली होती. श्रीदेवीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी बोनी कपूर, लहान बहिण खूशी कपूरसह ती आली होती.