मुंबई - बॉलिवूडच्या लाडक्या जोडीमध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा यांची लोकप्रियता अधिक आहे. दोघंही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले वेगवेगळे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. जेनेलिया दोन मुलांची आई आहे. तरीही तिने आपला फिटनेस कायम ठेवला आहे. तिच्या सौंदर्याची क्रेझ आजही पाहायला मिळते. मात्र, स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती कशी कसरत करते, हे तिने शेअर केलेल्या या व्हिडिओतून पाहायला मिळते.
जेनेलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती जिममध्ये कसरत करताना दिसते. तिचा हा व्हिडिओ पाहुन चाहत्यांनीही तिचं कौतुक केलं आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत ५ लाखापेक्षा जास्त व्हव्ज मिळाले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -Public Review: सैफ अली खानचा लाल कप्तान चित्रपटगृहात, पाहा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
या व्हिडिओनंतर तिने साडी लूकमधीलही काही फोटो शेअर केले आहेत. इथॅनिक लूकमध्ये असलेले तिचे फोटो कमालीचे आकर्षक आहे. या फोटोतूनही तिच्या सौंदर्याची झलक पाहायला मिळते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जेनेलिया चित्रपटांपासून लांब असली तरी रितेशसोबत ती विविध कार्यक्रमात हजेरी लावते. यावेळी दोघांचाही ग्लॅमरस अंदाज सर्वांचं लक्ष वेधतो.
हेही वाचा -गांधी @150 : बॉलिवूड कलाकारांनी सांगितले महात्मा गांधीचे विचार, पंतप्रधान मोदींची घेतली भेट