मुंबई - आंतरराष्ट्रीय पॉप स्टार केटी पेरीने अलिकडेच एका म्यूझिक फेस्टिव्हलसाठी भारतात हजेरी लावली आहे. मुंबईत या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना या कायक्रमाची प्रचंड आतुरता आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही केटीची चाहती आहे. तिने तिच्यासोबतची एक सेल्फी शेअर करुन तिच्या परफॉर्मन्ससाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.
जॅकलिनने मुंबईत केटीची भेट घेतली. १६ नोव्हेंबरला केटी म्यूझिक फेस्टिव्हलमध्ये परफॉर्मन्स करणार आहे. तिच्यासोबत आतंरराष्ट्रीय गायिका दुला लिपा देखील उपस्थित राहणार आहे. अलिकडेच तिला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं.
- View this post on Instagram
With the diva herself! @katyperry 💖 Are you guys ready for Nov 16th? #oneplusmusicfestival 💃🏻
">
हेही वाचा -पॉपस्टार केटी पेरीचं मुंबईत आगमन
केटीच्या परफॉर्मन्ससाठी चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता पाहायला मिळते.