ETV Bharat / sitara

जॅक्सन ब्राऊनला कोरोना व्हायरसची लागण, मुलाखतीत खुलासा - Jackson Browne tests positive for COVID 19

७१ वर्षाचा स्टार गायक जॅक्सन ब्राऊन याला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. एका मुलाखतीत त्याने याचा खुलासा स्वतःच केलाय. न्यूयॉर्क दौऱ्यामध्ये कोरोनाचे संक्रमण झाल्याचे त्याने म्हटलंय.

Jackson Browne
जॅक्सन ब्राऊन
author img

By

Published : Mar 25, 2020, 2:36 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिकन गायक जॅक्सन ब्राऊन याला कोरोना व्हायरसचे संक्रमण झाले आहे. कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे त्याने दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

मंगळवारी ऑनलाईन मीडियासोबत झालेल्या चर्चेत जॅक्सनने ताप आणि खोकला वाढल्यामुळे तपासणी केल्याचे सांगितले.

जॅक्सनचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आपल्या आजाराच्या गंभीरतेबद्दल बोलताना म्हणाला, ''माझ्यातील लक्षणे थोडी कमी आहेत. त्यामुळे मला रुग्णालयात दाखल होण्याची किंवा औषधांची आवश्यकता नाही.''

लोकांना लक्षणे दिसली किंवा नाही दिसली तर घरात राहण्याचा इशारा देताना जॅक्सन म्हणाला, ''काही लोकांनी अजूनपर्यंत टेस्ट केलेली नाही. त्यांच्यात लक्षणे दिसत नाहीत परंतु त्यांच्यात असतील आणि ते इतरांनाही संक्रमित करतील. ही गोष्ट तरुणांना समजली पाहिजेत. याचा अर्थ असा की कुठेही जाऊ नका, कोणाला न भेटणे कोणाच्याही संपर्कात न येणे.''

जॅक्सन यांना न्यूयॉर्क दौऱ्यामध्ये कोरोनाचे संक्रमण झाले आहे. याबद्दल बोलताना त्याने सांगितले, ''मी जर न्यूयॉर्कला गेलो नसतो तर बरे झाले असते, असे मला वाटत आहे.''

जॅक्सनने आपल्या ट्विटर हँडलवर मुलाखतीची लिंक शेअर केली आहे.

हॉलिवूडचे अनेक सेलेब्रिटी कोरोनाच्या संक्रमणाने त्रस्त झाले आहेत. यामध्ये इदरिस एल्बा आणि त्याची पत्नी सबरीना, टीवी होस्ट एंडी कोहेन, 'गेम ऑफ थ्रोन्स' अ‌ॅक्टर्स क्रिस्टोफर हिव्जू आणि इंदिरा वर्मा इत्यादींच्या नावाचा समावेश आहे.

दिग्गज हॉलिवूड स्टार टॉम हँक्स आणि त्याची पत्नी रिटा विल्सनही कोरोनाच्या जाळ्यात अडकले होते. आता ते उपचारानंतर घरी परतले आहेत आणि त्यांची तब्येत चांगली आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.