ETV Bharat / sitara

B'Day Spl: 'त्या' एका घटनेमुळे 'जग्गू दादा' बनला जॅकी श्रॉफ!

author img

By

Published : Feb 1, 2019, 1:41 PM IST

बॉलिवूडचा 'हिरो' जॅकी श्रॉफ यांचा आज वाढदिवस आहे. जॅकी श्रॉफ यांनी जाहिरात क्षेत्रातून पदार्पण करत बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. त्यांचे खरे नाव 'जय किशन' असे आहे. ते जेथे राहत असत तिथे ते 'जग्गू दादा' नावाने प्रसिद्ध होते. त्यांनी आत्तापर्यंत २२० चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात या काही खास गोष्टी...

जॅकी श्रॉफ

मुंबई - बॉलिवूडचा 'हिरो' जॅकी श्रॉफ यांचा आज वाढदिवस आहे. जॅकी श्रॉफ यांनी जाहिरात क्षेत्रातून पदार्पण करत बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. त्यांचे खरे नाव 'जय किशन' असे आहे. ते जेथे राहत असत तिथे ते 'जग्गू दादा' नावाने प्रसिद्ध होते. त्यांनी आत्तापर्यंत २२० चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात या काही खास गोष्टी...

जॅकी श्रॉफ यांचा जन्म लातूर तालुक्यातील उद्गीर येथे झाला. त्यांचे वडील काकुभाई हरिभाऊ श्रॉफ हे गुजराती होते, तर आई तुर्कस्थानी होती. जॅकी श्रॉफ यांनी 'हिरो' चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले होते. त्यांचा हा चित्रपट त्यांच्या करिअरसाठी खऱ्या अर्थाने मैलाचा दगड ठरला. त्यांनी हिंदीव्यतिरिक्त कोंकणी, कन्नड, मराठी, उडियां, पंजाबी, बंगाली, मल्याळम, तमिळ, तेलुगू, भोजपूरी आणि गुजराती या भाषेतील चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या स्टाईलसाठीही ते सिनेजगतात प्रसिद्ध आहेत. सुरुवातीला मॉडेल बनण्यापूर्वी ते त्यांच्या भागातील 'दादा' म्हणून ओळखले जात होते. यामागचं कारणंही त्यांनी सांगितले होते. त्यांचा भाऊ त्यांच्या वस्तीतला खरा दादा होता. एकेदिवशी तो कुणालातरी वाचवण्यासाठी समुद्रात उतरला आणि जॅकी श्रॉफ यांच्यासमोरच त्याला जलसमाधी मिळाली. तेव्हापासून त्यांनी वस्तीची जबाबदारी स्वीकारली होती.

undefined

करिअरच्या कारकिर्दीबद्दल त्यांनी सांगतले होते, की एकेदिवशी ते देवआनंद यांचा 'स्वामी दादा' या चित्रपटाची शूटिंग पाहण्यासाठी गेले होते. गर्दीत उभे असताना देवआनंद यांनी त्यांना पाहिले आणि त्यांना जवळ बोलावले. देवआनंद यांनीच जॅकीला एक भूमिका ऑफर केली होती. त्यानंतर जॅकी श्रॉफच्या करिअरला कलाटणी मिळाली.
पुढे दिग्दर्शक सुभाष घई यांनी जॅकी श्रॉफ यांना 'हिरो' चित्रपटात ब्रेक दिला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाला. मिनाक्षी शेशांद्रीबरोबर त्यांच्या जोडीलाही प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटातील 'लंबी जुदाई' हे गाणं आजही चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेतं.

अभिनयाच्या प्रसिद्धीझोतात असतानाच जॅकी श्रॉफ यांना आयशा दत्त हिच्यावर प्रेम जडले. आयशा तेव्हा केवळ १३ वर्षांची होती. मात्र, जॅकी आधीच रिलेशनशिपमध्ये होता. त्यांची गर्लफ्रेन्ड अमेरिकेला गेली होती. पुढे आयेशानेच त्यांच्या गर्लफ्रेन्डला एक पत्र लिहून त्यांच्या वाटेतील अडथळा दूर केला. त्यानंतर दोघांनीही ५ जून १९८७ साली लग्न केले. आता त्यांना २ मुले आहेत. त्यांचा मुलगा टायगर श्रॉफनेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Intro:Body:

B'Day Spl: 'त्या' एका घटनेमुळे 'जग्गू दादा' बनला जॅकी श्रॉफ!

बॉलिवूडचा 'हिरो' जॅकी श्रॉफ यांचा आज वाढदिवस आहे. जॅकी श्रॉफ यांनी जाहिरात क्षेत्रातून पदार्पण करत बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. त्यांचे खरे नाव 'जय किशन' असे आहे. ते जेथे राहत असत तिथे ते 'जग्गू दादा' नावाने प्रसिद्ध होते. त्यांनी आत्तापर्यंत २२० चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात या काही खास गोष्टी...

जॅकी श्रॉफ यांचा जन्म लातूर तालुक्यातील उद्गीर येथे झाला. त्यांचे वडील काकुभाई हरिभाऊ श्रॉफ हे गुजराती होते, तर आई तुर्कस्थानी होती.

जॅकी श्रॉफ यांनी 'हिरो' चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले होते. त्यांचा हा चित्रपट त्यांच्या करिअरसाठी खऱ्या अर्थाने मैलाचा दगड ठरला.

त्यांनी हिंदीव्यतिरिक्त कोंकणी, कन्नड, मराठी, उडियां, पंजाबी, बंगाली, मल्याळम, तमिळ, तेलुगू, भोजपूरी आणि गुजराती या भाषेतील चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या स्टाईलसाठीही ते सिनेजगतात प्रसिद्ध आहेत. सुरुवातीला मॉडेल बनण्यापूर्वी ते त्यांच्या भागातील 'दादा' म्हणून ओळखले जात होते. यामागचं कारणंही त्यांनी सांगितले होते. त्यांचा भाऊ त्यांच्या वस्तीतला खरा दादा होता. एकेदिवशी तो कुणालातरी वाचवण्यासाठी समुद्रात उतरला आणि जॅकी श्रॉफ यांच्यासमोरच त्याला जलसमाधी मिळाली. तेव्हापासून त्यांनी वस्तीची जबाबदारी स्विकारली होती.

करिअरच्या कारकिर्दीबद्दल त्यांनी सांगतले होते, की एकेदिवशी ते देवआनंद यांचा 'स्वामी दादा' या चित्रपटाची शूटिंग पाहण्यासाठी गेले होते. गर्दीत उभे असताना देवआनंद यांनी त्यांना पाहिले आणि त्यांना जवळ बोलावले. देवआनंद यांनीच जॅकीला एक भूमिका ऑफर केली होती. त्यानंतर जॅकी श्रॉफच्या करिअरला कलाटणी मिळाली.

पुढे दिग्दर्शक सुभाष घई यांनी जॅकी श्रॉफ यांना 'हिरो' चित्रपटात ब्रेक दिला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाला. मिनाक्षी शेशांद्रीबरोबर त्यांच्या जोडीलाही प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटातील 'लंबी जुदाई' हे गाणं आजही चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेतं.

अभिनयाच्या प्रसिद्धीझोतात असतानाच जॅकी श्रॉफ यांना आयशा दत्त हिच्यावर प्रेम जडले. आयशा तेव्हा केवळ १३ वर्षांची होती. मात्र, जॅकी आधीच रिलेशनशिपमध्ये होता. त्यांची गर्लफ्रेन्ड अमेरिकेला गेली होती. पुढे आयेशानेच त्यांच्या गर्लफ्रेन्डला एक पत्र लिहून त्यांच्या वाटेतील अडथळा दूर केला. त्यानंतर दोघांनीही ५ जून १९८७ साली लग्न केले. आता त्यांना २ मुले आहेत. त्यांचा मुलगा टायगर श्रॉफनेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.