ETV Bharat / sitara

‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' चित्रपटात ११ नामांकित कलाकारांबरोबर १४ नवीन कलाकार - Sushruta Bhagwat

एक अनोख्या नावाचा चित्रपट येऊ घातलाय ज्याचे नाव आहे ;८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी'. या चित्रपटाची अजून एक खासियत आहे ती म्हणजे या चित्रपटाद्वारे एक-दोन नव्हे तर तब्बल १४ नवीन कलाकार चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवताहेत.

new Marathi film
‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी'
author img

By

Published : Feb 9, 2021, 1:31 PM IST

मुंबई - प्रत्येक चित्रपटात नायक नायिकांसोबत सहकलाकारांचे योगदान महत्वपूर्ण असते. बऱ्याचदा एखाद-दुसरा नवीन कलाकार चांगल्या अभिनयाने लोकाश्रय मिळवून जातो. आता एक अनोख्या नावाचा चित्रपट येऊ घातलाय ज्याचे नाव आहे ;८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी'. या चित्रपटाची अजून एक खासियत आहे ती म्हणजे या चित्रपटाद्वारे एक-दोन नव्हे तर तब्बल १४ नवीन कलाकार चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवताहेत. उदाहरणार्थ बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचे निर्माते आहेत विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते आणि सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची पटकथा शर्वाणी पिल्लई आणि सुश्रुत भागवत यांनी लिहिली आहे, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते यांचे संगीत दिग्दर्शन आहे.

new Marathi film
‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' पोस्टर
अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के अशी चित्रपटाची दमदार स्टारकास्ट असून अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. दिग्दर्शक सुश्रुत भागवत म्हणाले, की '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांनी विशेष ठरणार आहे. चित्रपटाचा विषय खास आणि महत्त्वाचा आहेच, पण १४ नवीन कलाकार ही देखील विशेष बाब आहे. या १४ नव्या कलाकारांच्या भूमिकाही नक्कीच महत्वपूर्ण आहेत.चित्रपटाचे चित्रीकरण हे नुकतेच पूर्ण झाले असून आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.आगळ्यावेगळ्या नावामुळे चर्चेत असलेल्या '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' हा चित्रपट, ज्यातून १४ नव्या कलाकारांना संधी मिळाली आहे, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.