हाऊ टू ट्रेन युवर ड्रॅगन हा थ्रीडी एनिमेटेड चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. भारतात हा चित्रपट २१ मार्च रोजी रिलीज होईल. इंग्लिश, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत हा चित्रपट पाहता येणार आहे. ड्रीमवर्क्स एनिमेशन प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती असलेला हा चित्रपट अबालवृध्दांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरु शकतो.
या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आलंय. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी हे पोस्टर शेअर करीत रिलीजची तारीख जाहीर केली आहे.
हाऊ टू ट्रेन युवर ड्रॅगन हा चित्रपट याच शीर्षकाने प्रकाशित २००३ मध्ये झालेल्या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०१० मध्ये रिलीज झाला. या चित्रपटाने जगभर तब्बल ५०० मिलीयन डॉलर्सचा गल्ला जमवला होता. अमेरिका आणि कॅनडामध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा ५ वा चित्रपट ठरला होता. ८३ व्या ऑस्कर पुरस्कारात याला सर्वश्रेष्ठ एनिमेटेड फ़िल्म, सर्वश्रेष्ठ ध्वनी यासाठी नामांकन मिळाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग आला होता. यालादेखील प्रेक्षकांनी उचलून धरले होते. आता या चित्रपटा तिसरा सीक्वल प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे,