ETV Bharat / sitara

‘हॉरर-कॉमेडी’ जॉनरचा ‘ओह माय घोस्ट’, १२ फेब्रुवारीला प्रदर्शनासाठी सज्ज!

author img

By

Published : Feb 4, 2021, 3:48 PM IST

‘हॉरर’ हा प्रकार मराठी सिनेमांतून फारसा दिसत नाही. आता प्रथमेश परबची प्रमुख भूमिका असलेला ‘हॉरर-कॉमेडी’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे तो म्हणजे, ‘ओह माय घोस्ट’. या चित्रपटाच्या नावात ‘हॉरर’ तर आहेच परंतु तो प्रेक्षकांना घाबरवत गुदगुल्या देखील करणार आहे.

'Oh My Ghost'
ओह माय घोस्ट’

मराठी - मराठीमध्ये आशयघन चित्रपट बनत असले तरी विनोदी चित्रपटांना जोरदार मागणी आहे. मराठी चित्रपट नेहमीच स्टार-सिस्टिमच्या विरुद्ध जाऊन उत्तम अदाकारीला सलाम करत आला आहे. मराठी चित्रपटाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात विनोदी चित्रपटांचा मोठा वाटा आहे. म्हणूनच इतर ‘जॉनर’ चे चित्रपट बनत असले तरीही विनोदी चित्रपटही बनतच असतात. ‘हॉरर’ हा प्रकार मराठी सिनेमांतून फारसा दिसत नाही. आता प्रथमेश परबची प्रमुख भूमिका असलेला ‘हॉरर-कॉमेडी’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे तो म्हणजे, ‘ओह माय घोस्ट’.

'Oh My Ghost'
‘ओह माय घोस्ट’ पोस्टर
‘ओह माय घोस्ट’ या चित्रपटाच्या नावात ‘हॉरर’ तर आहेच परंतु तो प्रेक्षकांना घाबरवत गुदगुल्या देखील करणार आहे. जग्गू, एक अनाथ मुलगा, ज्याला जीवनात आपण काहीच मिळवू शकलो नाही, अशा हताश मनःस्थितीत असताना त्याला स्वप्नात भूते दिसू लागतात. आपण दुर्देवी आणि अभागी असल्याने आपल्या बाबतीत असे होते आहे, असे त्याला वाटू लागते आणि त्याच्या जीवनातील समस्या अधिक गुंतागुंतीच्या होतात. जग्गूला स्वतःचे आयुष्य आधीच ओझे वाटत असताना आता त्याला या भुताखेतांच्या विश्वाला सामोरे जावे लागते. या भूतांच्या ससेमिऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी तो अनेक क्लृप्त्या करतो पण त्यातूनच त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो.
'Oh My Ghost'
ओह माय घोस्ट’ टीमसोबत प्रथमेश
बॉलिवूडमधील ‘डीओपी’ वसिम खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन व छायांकन केले आहे. मराठमोळा गायक, जो इंडियन आयडॉल ११ चा दोन नंबरचा विनर होता, रोहित राऊत ने या चित्रपटाद्वारे चित्रपट संगीत दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. ‘ओह माय घोस्ट’ या चित्रपटात प्रथमेश परब, काजल शर्मा, पंकज विष्णू, कुरूस देबू, प्रेम गढवी, दिपाली पाटील आणि अपूर्वा देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘जम्पिंग टोमॅटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘फिल्मोशन पिक्चर्स’च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती सना वसिम खान आणि रोहनदीप सिंह यांनी केली आहे. हॉरर कॉमेडी प्रकारातील हा चित्रपट १२ फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झालाय.हेही वाचा - अभिनेत्री रश्मीका मंदनाचा ‘मिशन मजनू’ आहे सिद्धार्थ मल्होत्रा!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.