मुंबई - 'प्रत्येक आई असतेच हिरकणी', अशी टॅगलाईन असलेला 'हिरकणी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या बाळाला भेटण्यासाठी शिवरायांचा कठिण गड उतरणाऱ्या हिरकणीची शौर्यगाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. नुकतंच या चित्रपटातील आईची महती सांगणारं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या आवाजातील हे गाणं काळजाचा ठाव घेणारं आहे. संदीप खरे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर, अमितराज यांनी संगीत दिलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -भावनिक कथेला मनोरंजनाची झालर, 'बबली' चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरला चाहत्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. सोनाली कुलकर्णीचा लूकही या चित्रपटाचं विशेष आकर्षण आहे. हिरकणीच्या भूमिकेत सोनालीला पडद्यावर पाहायला मिळणार असल्यामुळे या चित्रपटाची आतुरता आहे. हिरकणीची भूमिका आव्हानात्मक असल्याचं सोनालीने सांगितलं होतं.
या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओकने केलं आहे.
हेही वाचा -'अग्निहोत्र'च्या मालिकेत कोणतं रहस्य असणार? दुसरा भाग पुन्हा 'स्टार प्रवाह'वर