ETV Bharat / sitara

'बधाई दो'चा मुहूर्त ठरला! नववर्षात होणार चित्रिकरणाला सुरुवात

author img

By

Published : Oct 18, 2020, 3:50 PM IST

जानेवारी २०२१मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात येणार आहे. भूमी पेडणेकरने याबाबत माहिती दिली. राजकुमार राव, आणि जंगली पिक्चर्सना टॅग करत तिने लवकरच सेटवर भेटू, अशा आशयाची पोस्ट केली आहे. यासोबतच तिने राजकुमार राव याच्यासोबतचा आपला एक फोटोही पोस्ट केला आहे, ज्यात ते दोघे हस्तांदोलन करताना दिसत आहेत...

Here's when Bhumi Pednekar and Rajkummar Rao starrer Badhaai Do goes on floor
'बधाई दो'चा मुहूर्त ठरला! नववर्षात होणार चित्रिकरणाला सुरुवात

मुंबई : २०१८ला आलेल्या 'बधाई हो' चित्रपटाचा दुसरा भाग आता लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव हे दोघे या चित्रपटात एकत्र दिसतील. 'जंगली पिक्चर्स'ने मार्चमध्येच या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यानंतर आता याच्या चित्रिकरणाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

जानेवारी २०२१मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात येणार आहे. भूमी पेडणेकरने याबाबत माहिती दिली. राजकुमार राव, आणि जंगली पिक्चर्सना टॅग करत तिने लवकरच सेटवर भेटू, अशा आशयाची पोस्ट केली आहे. यासोबतच तिने राजकुमार राव याच्यासोबतचा आपला एक फोटोही पोस्ट केला आहे, ज्यात ते दोघे हस्तांदोलन करताना दिसत आहेत.

बधाई दो हा एक विनोदी चित्रपट असणार आहे. बधाई हो पेक्षा यातील पात्रे आणि कथा एकदम वेगळी असणार आहे. दोन्ही चित्रपट कौटुंबिक आहेत, हाच काय तो यामधील समान धागा असेल, असे सांगण्यात आले आहे. हर्षवर्धन कुलकर्णी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

हेही वाचा : राजकुमार रावची धमाल 'छलांग', बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.