मुंबई - 'थलायवी' या चित्रपटातील 'चली चली' हे गाणे शुक्रवारी रिलीज झाले आहे. अभिनेत्री कंगना रनौत 'थलायवी' या चित्रपटात तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए. एल. विजय यांनी केलंय. चित्रपटाचे शूट परफेक्ट झाले कारण रिहर्सलसाठी आवश्यक वेळ दिला होता, असे विजय यांनी म्हटलंय.
''जयललीता यांची पडद्यावरील व्यक्तीरेखा जेवढी आकर्षक होती ती पुन्हा 'थलायवी'साठी निर्माण करणे हे जाबाबदारीचे काम होते. तथापि, चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या कंगनाने त्यांचा पूर्वाभ्यास केला आणि कठोर परिश्रम घेतले. गाणे परफेक्ट व्हावे यासाठी अत्यंत मेहनत करण्यात आली आणि महिनाभराच्या शूटनंतर गाणे पूर्ण झाले,'' असे विजय यांनी सांगितले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
या गाण्यामध्ये जयललीता यांचा राजकारणात प्रवेश होण्यापूर्वी झालेला चित्रपटातील प्रवास दाखवण्यात आलाय. हे गाणे परिपूर्ण आहे याची खात्री करण्यासाठी बरीच संशोधन करण्यात आल्याचे दिग्दर्शक सांगतात.
"जयललिताजी तमिळ सिनेमाची प्रस्थापित सुपरस्टार होती, सुरुवातीला रोमान्स क्वीन आणि नंतर आदरणीय दिग्गज अभिनेत्री अशी त्यांची प्रतिमा होती. जयललिताजींच्या चित्रपटाचे स्वरूप आणि भावना समजून घेण्यासाठी आम्ही व्यापक संशोधन केले आणि त्यानुसार प्रयत्न केले आणि त्याचे हुबेहुब प्रतिबिंब पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला.'', असे दिग्दर्शक विजय म्हणाले.
२३ एप्रिलला थलायवी हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये रिलीज होणार आहे.
हेही वाचा -करण जोहरने केले 'अजिबा दास्तां' चित्रपाटाच्या ट्रेलरचे अनावरण