श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या चार दिवसांपासून झालेल्या बर्फवृष्टीमुळे केंद्रशासित प्रदेश विशेषत: काश्मीर खोऱ्यातील काही भाग उर्वरित देशापासून तुटला आहे. रविवारी पासून काश्मीरला जाण्यासाठीची सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
घाटीत सलग चौथ्या दिवस मुसळधार पाऊस पडल्याने मुघल रोडसह सर्व महामार्ग बंद राहिले, तर सर्व आंतरजिल्हा रस्ते एकतर बंद आहेत किंवा वाहने जाण्यासाठी खूप निसरडे झाले आहेत.
२०० हून अधिक स्नो क्लीयरन्स मशीन्स कार्यरत
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, खासकरुन रुग्णालये आणि इतर महत्वाच्या ठिकाणी बर्फ साफ करण्याचे काम सुरू होते. ते म्हणाले की, संपूर्ण खोऱ्यात २०० हून अधिक स्नो क्लीयरन्स मशीन्स कार्यरत आहेत पण सतत मुसळधार हिमवृष्टीमुळे क्लिअरन्स करणे कठीण होत आहे.
वाहतुकीवर परिणाम
उत्तर काश्मीरच्या भागात पहिल्या दोन दिवसांपासून झालेल्या बर्फवृष्टीच्या तुलनेत कमी बर्फवृष्टी झाली होती. बुधवारी सकाळपर्यंत मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी झाली असून मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
हवामान विभागानुसार बारामुलातील स्की-रिसॉर्ट गुलमर्ग येथे दोन फूटांपेक्षा जास्त ताजी बर्फवृष्टी झाली.
हवामानात सुधारणा होण्याची शक्यता
बर्फवृष्टीचा सर्वाधिक प्रभाव दक्षिणेकडील व मध्य काश्मीरमध्ये दिसून आला जेथे मैदानावर सुमारे तीन फूट बर्फ पडला.
आज दुपारपासून हवामानात सुधारणा होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
हेही वाचा - हवाईदलाचे मिग-२९ अपघातग्रस्त; वैमानिकाला वाचवण्यात यश