ETV Bharat / sitara

मुंबईतील मुसळधार पावसाचा कलाक्षेत्रालाही फटका, टीव्ही मालिकांची शुटिंग रद्द

मालिकांच्या शुटिंगचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच गोरेगाव फिल्मसिटीला या पावसाचा मोठा फटका बसलाय.

मुंबईतील मुसळधार पावसाचा कलाक्षेत्रालाही फटका, टीव्ही मालिकांची शुटिंग रद्द
author img

By

Published : Jul 2, 2019, 2:59 PM IST

Updated : Jul 2, 2019, 5:30 PM IST

मुंबई - सलग ४ दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कलाक्षेत्रालाही फटका बसला आहे. या पावसामुळे बऱ्याच टीव्ही मालिकांचे शुटींग रद्द करण्यात आले आहे.

यशोमान आपटे

मालिकांच्या शुटिंगचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच गोरेगाव फिल्मसिटीला या पावसाचा मोठा फटका बसलाय. मात्र तरीही या चित्रनगरी मध्ये शूट होणारी 'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि 'श्री गुरुदेव दत्त' या मालिकांची शुटिंग आजही सुरू आहेत. मात्र, कलर्स मराठीवरील 'बाळूमामाच्या नावान चांगभलं' या मालिकेचं बहुतांश शुटिंग आउटडोअर होत असल्याने या मालिकेच्या निर्मात्यांनी शुटिंग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आजकाल बऱ्याचशा मराठी मालिकाच शुटिंग ठाण्यातील घोडबंदर परिसरात ओवळा परिसरात होत. ठाण्यात प्रचंड पाऊस झाल्याने त्याचा फटका या मालिकांच्या चित्रीकरणाला बसलाय. झी युवा वरील 'फुलपाखरू' आणि 'वर्तुळ' या मालिकांनी सेटवर येण्याचे रस्ते जलमय झाल्यामुळे आपलं चित्रीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर 'ह. म. बने तु. म.बने' आणि 'घाडगे अँड सून' या मालिकांची घोडबंदर रोडवरील शुटिंगसही आज रद्द करण्यात आली आहेत.

याशिवाय मढ आयलंडला शूट होणाऱ्या 'एक होती राजकन्या', 'तू अशी जवळी रहा' आणि 'एक घर मंतरलेल' या मालिकांची शुटिंग आज बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान 'फुलपाखरू' मालिकेतील 'मानस'ची भूमिका करणाऱ्या यशोमन आपटे याने मुंबईकरांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे.

या मालिकाच शुटिंग आलिशान बंगल्यात घडत असल्याने तिथे पाणी भरण्याचा धोका नसतो. मात्र सेटकडे येणारे मार्ग जलमय झाल्यामुळे कलाकारांना तिथे पोहोचणं, शुटिंगचे समान हलवणे आणि जेवण यासाठी मोठी कसरत करावी लागते. ती टाळण्यासाठी हे शुटिंग रद्द करण्यात आल्याचे चॅनलच्या वतीने सांगण्यात आलंय.

तुर्तात पावसाचा जोर ओसरला असला तरीही पुढचे ४८ तास मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे वेळीच पाऊस थांबला नाही तर दिवस रात्र शुटिंग करणाऱ्या मराठी टीव्ही इंडस्ट्री समोर एपिसोड बँकिंगचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

Intro:मुंबईत गेले दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका टीव्ही मालिकांच्या शूटिंगला बसलाय .त्यामुळे बहुतांश टीव्ही मालिकांचे शुटींग रद्द करण्यात आलं आहे.

मुंबईतील अनेक मालिकांच्या शुटिंगचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच गोरेगाव फिल्मसिटीला या पावसाचा मोठा फटका बसलाय. मात्र तरीही या चित्रनगरी मध्ये शूट होणारी 'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि 'श्री गुरुदेव दत्त' या मालिकांची शुटिंग आजही सुरू आहेत. मात्र कलर्स मराठीवरील 'बाळूमामाच्या नावान चांगभलं' या मालिकेचं बहुतांश शुटिंग आउटडोअर होत असल्याने या मालिकेच्या निर्मात्यांनी शुटिंग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आजकाल बऱ्याचशा मराठी मालिकाच शुटिंग ठाण्यातील घोडबंदर परिसरात ओवळा परिसरात होत. ठाण्यात प्रचंड पाऊस झाल्याने त्याचा फटका या मालिकांच्या चित्रीकरणाला बसलाय. झी युवा वरील 'फुलपाखरू' आणि 'वर्तुळ' या मालिकांनी सेटवर येण्याचे रस्ते जलमय झाल्यामुळे आपलं चित्रीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर 'ह. म. बने तु. म.बने' आणि 'घाडगे अँड सून' या मालिकांची घोडबंदर रोडवरील शुटिंगसही आज रद्द करण्यात आली आहेत.

याशिवाय मढ आयलंड ला शूट होणाऱ्या 'एक होती राजकन्या', 'तू अशी जवळी रहा' आणि 'एक घर मंतरलेल' या मालिकांची शुटिंग आज बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान 'फुलपाखरू' मालिकेतील 'मानस'ची भूमिका करणाऱ्या यशोमन आपटे याने मुंबईकरांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे.

या मालिकाच शुटिंग आलिशान बंगल्यात घडत असल्याने तिथे पाणी भरण्याचा धोका नसतो. मात्र सेटकडे येणारे मार्ग जलमय झाल्यामुळे कलाकारांना तिथे पोहोचणं, शुटिंगचे समान हलवणे आणि जेवण यासाठी मोठी कसरत करावी लागते. ती टाळण्यासाठी हे शुटिंग रद्द करण्यात आल्याचे चॅनलच्या वतीने सांगण्यात आलंय.

तुर्तात पावसाचा जोर ओसरला असला तरीही पुढचे 48 तास मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे वेळीच पाऊस थांबला नाही तर दिवस रात्र शुटिंग करणाऱ्या मराठी टीव्ही इंडस्ट्री समोर एपिसोड बँकिंगचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. Body:.Conclusion:.
Last Updated : Jul 2, 2019, 5:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.