ETV Bharat / sitara

HBD Jr. NTR : जाणून ज्यूनियर 'एनटीआर'च्या या खास गोष्टी!!

ज्यूनियर एनटीआर चित्रपटांसाठी पूर्णपणे समर्पित दिसतो. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे इतक्या मोठा स्टार असूनही जमिनीशी जोडलेला आहे. चित्रपटाच्या सेटवर वेळेवर आगमन असो किंवा व्यक्तिरेखेसाठी केलेली मेहनत. त्याने यापासून कधीही माघार घेतली नाही. यामुळेच त्याला चाहत्यांचे अफाट प्रेम मिळते. आज त्याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याच्या विषयी थोडे जाणून घेऊयात.

HBD Jr. NTR
'एनटीआर'च्या या खास गोष्टी
author img

By

Published : May 20, 2021, 5:41 PM IST

दक्षिणचा अ‍ॅक्शन स्टार ज्युनियर एनटीआर आज आपला वाढदिवस साजरा करीत आहे. त्याचा जन्म २० मे १९८३ रोजी हैदराबाद येथे झाला होता. आंध्रचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ अभिनेते एनटी रामाराव यांचा तो नातू आहे. आजोबांप्रमाणे जूनियर एनटीआरलाही चित्रपट जगतात स्वत: साठी खास स्थान मिळवण्यात यश आले आहे. विशेषत: अ‍ॅक्शन, नृत्य आणि अभिनय या तिन्ही क्षेत्रामध्ये ज्युनियर एनटीआरचा बोलबाला आहे.

महान एनटीआर यांचा वारसा

ज्यूनियर एनटीआरने लहानपणापासूनच आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. स्वत: आजोबा चित्रपटांमधील अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असल्याने त्याला करिअर बनविण्यात कोणतीही अडचण नव्हती. आजोबा दिग्दर्शित ब्रह्मर्षी विश्वामित्र या चित्रपटात ज्युनिअर एनटीआरने बाल कलाकार म्हणून भूमिका केली होती.

आजोबांसारखाच दिसतो ज्यूनियर एनटीआर

ज्यूनियर एनटीआरचे पूर्ण नाव नन्दमुर्ती तारक रामा राव असे आहे. त्याचे दिसणे बहुतांशी आजोबा म्हणजेच एनटीआर यांच्या सारखे आहे. त्यामुळे सिने पदार्पणातच त्याने स्वतःची ओळख ज्यूनियर एनटीआर करुन घेतली. आज या घडीला दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत वरच्या स्थानावर आहे. आज त्याच्याकडे अनेक चित्रपट हातात आहेत.

टीव्ही शोमध्ये ज्यूनियर एटीआरचा जलवा

ज्यूनियर एनटीआरची लोकप्रियता लक्षात घेऊन बिग बॉस तेलुगु शोचे सूत्रसंचालन त्याच्याकडे देण्यात आले. या शोच्या हिट होण्यामागे त्याची लोकप्रियताही काही प्रमाणात कारणीभूत आहे.

अ‍ॅक्शन स्टार ज्यूनियर एनटीआर

फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटींच्या यादीमध्ये दोनदा समावेश झालेला ज्यूनियर एनटीआर अ‍ॅक्शन चित्रपटातील अनोख्या सीक्वेन्स आणि डान्स स्टेप्समुळेही ओळखला जातो. त्याच्या डान्स फॉर्ममध्ये तो चाहत्यांना खूप आवडतो.

लक्ष्मी प्रणतीसोबत संसार

एनटीआरने २०११ मध्ये लक्ष्मी प्रणतीशी लग्न केले होते. त्यांना दोन मुलेही आहेत. २००९मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान ज्यूनियर एनटीआर गंभीर जखमी झाला होता. तेलुगु देसम पक्षासाठी तो अहोरात्र कार्यरत होता. अपघातानंतर मृत्यूशी जिंकून तो पुन्हा रुपेरी पडद्यावर परतल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला होता.

वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन

ज्यूनियर एनटीआरचे खूप फॅन क्लब आहेत. आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यात मोठा उत्साह आहे. मात्र कालच ज्यूनियर एनटीआरने एक निवेदन प्रसिध्द करुन वाढदिवस साजरा न करण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन आपल्या तमाम चाहत्यांना केले होते.

हेही वाचा - लाईफ बियॉन्ड रिल' : सुपरस्टार दैवत... 'एनटीआर'!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.