ETV Bharat / sitara

Happy Holi! होळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी निवडा ही काही खास गाणी - होळीचा आनंद द्विगुणित करणारी गाणी

सदाबहार बॉलीवूड गाण्यांवर नाचल्याशिवाय होळीचा उत्सव पूर्ण होत नाही. ही काही आनंदी बॉलीवूड गाणी आहेत जी या वर्षी तुमच्या होळी पार्टीच्या प्लेलिस्टमध्ये असणे आवश्यक आहे.

होळीची खास गाणी
होळीची खास गाणी
author img

By

Published : Mar 18, 2022, 11:59 AM IST

मुंबई - आजचा होळीचा एक असा सण आहे ज्या दिवशी आपल्या प्रियजनांसोबत रंग उधळण्याचा आनंद संपूच नये असे वाटत असते. अशा या आनंदी प्रसंगी सदाबहार बॉलीवूड गाण्यांवर नृत्य केल्याशिवाय होळीचा कोणताही उत्सव पूर्ण होत नाही.

ही काही होळीची खास गाणी आहेत जी तुम्ही तुमच्या सणाच्या प्लेलिस्टमध्ये जरुर असली पाहिजेत.

रंग बरसे भीगे चुनर वाली: मेगास्टार अमिताभ बच्चन हे त्यांच्या खोल भव्य बॅरिटोन आवाजासाठी प्रसिद्ध आहेत. संवादांव्यतिरिक्त त्यांनी अनेक गाण्यांना आपला अनोखा आवाज देखील दिला आहे. त्यापैकी एक म्हणजे 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिलसिला चित्रपटातील रंग बरसे. गाणे रिलीज होऊन 40 वर्षे झाली आहेत आणि आजपर्यंत रंग बरसे हे होळीचे आवडते गाणे आहे. सर्व श्रेय बिग बींचे दिवंगत वडील आणि दिग्गज कवी हरिवंशराय बच्चन यांना जाते. त्यांनी रंगांच्या उत्सवाभोवती आनंदी गीते लिहिली आहेत. रेखा, बिग बी, जया बच्चन आणि दिवंगत संजीव कुमार यांची गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये असलेली उपस्थिती रंग बरसेला आणखी खास बनवते.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

होली के दिन: प्रख्यात गायिका लता मंगेशकर आता नाहीत पण त्यांचा अमर आवाज सण किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगी नक्कीच मूड उंचावतो. शोले (1975) चित्रपटातील होली के दिन गाणे आम्हाला दिल्याबद्दल त्यांचे आणि स्वर्गीय किशोर कुमार यांचे मानावे तितके आभार कमी आहेत. अभिनेता अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या जादुई आवाजात सुंदरपणे लिप-सिंक केले आणि हे गाणे सुपर-डुपर हिट झाले जे काळाच्या कसोटीवर उभे आहे. चाळीस वर्षानंतरही या गाण्याशिवाय होळीचा सण पूर्ण होत नाही.

होली खेले रघुवीरा: गीतकार समीरने बागबान चित्रपटातील होली खेले रघुवीरा या होळी गाण्यासाठी त्यांची लेखणी उचलली आमि एक सर्वोत्कृष्ट गीत तयार झाले. यामध्ये अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या होळीच्या गाण्याला बिग बींनी आपला आवाजही दिला. गाण्यात आणखी रंग भरत, निर्मात्यांनी उदित नारायण, अलका याज्ञिक आणि सुखविंदर सिंग यांच्या गायनाने बिग बींच्या आवाजाला जबरदस्त साथ दिली.

डू मी अ फेवर लेट्स प्ले होली: अनु मलिक जेव्हा होळीचे गीत बनवतात तेव्हा ते जल्लोष वाढवणारे असणार हे निश्चितच. त्यांचे होळीचे 'डू मी अ फेव्हर' गाणे असेच जल्लोष वाढवणारे आहे. पारंपारिक अवतारातील प्रियंका चोप्रासोबत स्क्रीन शेअर करणारा खेळकर अक्षय कुमार यांच्यामुळे हे गाणे अधिक पाहण्यायोग्य बनले आहे.

बलम पिचकारी: अयान मुखर्जी दिग्दर्शित ये 'जवानी है दिवानी' मधील बलम पिचकरी हे नवीन काळातील होळीचे गाणे ऐकल्याशिवाय होळीची प्लेलिस्ट अपूर्ण आहे. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्यावर चित्रित केलेला हा ट्रॅक तरुणाईच्या पसंतीस उतरला आहे.

तुमच्या संगीत प्लेलिस्टमध्ये बॉलिवूडच्या वरील गाण्यांचा समावेश करुन होलीचा आनंद द्विगुणित करा. तुम्हा सर्वांना होळी २०२२ च्या हार्दिक शुभेच्छा!!

हेही वाचा - अपूर्व मेहताच्या पार्टीत विकी आणि कॅटरिनाची जबरदस्त एन्ट्री पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.