ETV Bharat / sitara

दुबईत होणाऱ्या 'गल्फ सिने फेस्ट २०२१' सोहळ्याचे आयोजन ढकलले पुढे!

गेल्या वर्षी खास मराठी चित्रपटांसाठी दुबईत आयोजित करण्यात आलेला ‘गल्फ सिने फेस्ट २०२१‘ या महिन्यात संपन्न होणार होता परंतु सध्याची जागतिक सामाजिक परिस्थिती पाहता तो पुढे ढकलण्यात आला आहे.

Gulf Cine Fest 2021
‘गल्फ सिने फेस्ट २०२१‘
author img

By

Published : Jan 13, 2021, 12:47 PM IST

मुंबई - कोरोना महामारीत अंशतः अनलॉक उठल्यावर सिनेइंडस्ट्री जोमाने कामाला लागली. मालिका, चित्रपट, वेब-सिरीज ई. च्या चित्रीकरणाला वेग येऊ लागला तसेच अनेक चित्रपट एकाच छत्राखाली जमवणाऱ्या फिल्म फेस्टिवलच्या आयोजनांनीही डोके वर काढले. गेल्या वर्षी खास मराठी चित्रपटांसाठी दुबईत आयोजित करण्यात आलेला ‘गल्फ सिने फेस्ट २०२१‘ या महिन्यात संपन्न होणार होता परंतु सध्याची जागतिक सामाजिक परिस्थिती पाहता तो पुढे ढकलण्यात आला आहे.

कोरोना काळात मनोरंजनाची व्यासपीठे बदलत असताना नव्या ऊर्मीने दुबईत रंगणाऱ्या 'गल्फ सिने फेस्ट २०२१' या मराठी चित्रपटांच्या प्रीमियर सोहळ्याच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे. आखाती देशातील चित्रपटप्रेमींना आनंद देण्यासाठी तसेच मराठी चित्रपटसृष्टी नव्या ऊर्जेने आणि आत्मविश्वासाने सज्ज व्हावी या उद्देश्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी या सोहळ्याचे आयोजक असलेल्या '५ जी इंटरनॅशनल'ने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी एका छोटेखानी समारंभाचे नुकतेच आयोजन केले होते. दुबईत प्रीमियर होत असलेल्या तसेच इतरही मराठी चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ तसेच विविध वाहिन्यांचे पत्रकार, मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत विविध कंपन्यांचे प्रतिनिधीसुद्धा याप्रसंगी आवर्जून उपस्थित होते.

मराठी चित्रपटाला ‘ग्लोबली कनेक्ट’ करण्याचा आयोजक सचिन कटारनवरे यांच्या प्रयत्नाला दाद देत त्यांच्या धाडसाचे कौतुक ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी याप्रसंगी केले. '५ जी इंटरनॅशनल'च्या वतीने आयोजित 'गल्फ सिने फेस्ट २०२१' या सोहळ्यात काही निवडक बहुचर्चित आगामी मराठी चित्रपटांचे प्रीमियर शो संपन्न होणार आहेत. याखेरीज काही मराठी चित्रपटांच्या ट्रेलर्स, प्रोमोज आणि गाण्यांची झलकही सिनेचाहत्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. २०२१ या नव्या वर्षात सातासमुद्रापार रंगणारा हा सोहळा मराठी चित्रपटांसाठी कमालीचा उत्साहवर्धक ठरेल, असा आशावाद उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या या मान्यवर मंडळीनी आयोजक सचिन कटारनवरे यांच्या या अनोख्या कल्पनेला पाठिंबा दर्शवला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेत्री समीरा गुजर यांनी केले.

कोरोनाबाबतच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भातील नियमावलीमुळे २० ते २३ जानेवारी दरम्यान दुबईत रंगणाऱ्या या नियोजित सोहळ्याचे आयोजन शक्य नसल्याने पुढील तारखांची जुळवाजुळव सध्या सुरु असून लवकरच आयोजकांकडून त्याविषयीची पुढील माहिती कळविण्यात येणार आहे.

हेही वाचा - अबोल मैत्रीची बोलकी गोष्ट घेऊन ‘पिटर’ येतोय २२ जानेवारीला!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.