मुंबई - सुप्रसिद्ध शायर कैफी आझमी यांचा आज १०१ वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलद्वारे खास डूडल तयार करण्यात आले आहे. या डूडलद्वारे गुगलने कैफी आझमी यांनी आदरांजली वाहिली आहे.
कैफी आझमी हे कवी, गीतकार आणि पटकथालेखक म्हणून प्रसिद्ध होते. २० व्या शतकातील ते सुप्रसिद्ध कवी म्हणून ओळखले जात होते.
प्रेम कवितांपासून ते बॉलिवूडच्या गाण्यापर्यंत तसेच चित्रपटांच्या कथा लिहिण्यात कैफी आझमी यांचा हात कोणीही पकडू शकत नव्हते.
![Google Doodle pays Tribuite to Legendary poet Kaifi Azami on his 101 birth Anniversary](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/kaifi_1401newsroom_1579001708_262.jpg)
कैफी आझमी यांचा जन्म आजमगढ येथे झाला होता. त्यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी पहिली कविता लिहिली होती. पुढे ते उर्दू वृत्तपत्रात काम करण्यासाठी मुंबईला गेले होते. त्यांचा पहिला कवितासंग्रह 'झंकार' हा १९४३ साली प्रकाशित झाला होता. त्यानंतर ते लेखक संघाचे सदस्य बनले होते. त्यांनी समाजाच्या आर्थिक विकासासाठी आपल्या लेखनाचा वापर केला.
आपल्या दर्जेदार लेखनासाठी त्यांनी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये ३ फिल्मफेअर पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार यांचा समावेश आहे. त्यांना साहित्य अकादमीची फेलोशिप देखील मिळाली होती.
त्यांचा 'औरत' हा कवितासंग्रह देखील खूप गाजला होता. त्यांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी एनजीओची स्थापना देखील केली होती.
![Google Doodle pays Tribuite to Legendary poet Kaifi Azami on his 101 birth Anniversary](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/kaifi-2_1401newsroom_1579001708_686.jpg)
कैफी आझमी हे ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचे वडील आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी गाणी आणि गजल लिहल्या होत्या. यामध्ये देशभक्तीवर आधारित गाण्यांचाही समावेश होता. त्यांनी लिहलेले 'कर चले हम फिदा, जान - ओ - तन साथियों' हे गाणे खूपच गाजले. 'ये दुनिया ये मेहफिल मेरे काम की नही' आणि 'झुकी झुकी सी नजर बेकरार है की नही' यांसारखी सुंदर गाणी आजही लोकप्रिय आहेत.