ETV Bharat / sitara

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनास होतेय वारंवार गौरवांकित, देशालाबद्दल वाढवतेय अभिमान!

प्रियांका चोप्रा जोनासचे हॉलिवूडमधील वजन वाढतच असून तिने, आपले यजमान निक जोनास सह, यावर्षी ऑस्कर पुरस्कारांच्या नॉमिनेशन्सची घोषणा केली, आपल्या लंडनमधील घरातून. असा मान मिळणारी ती एकमेवाद्वितीय बॉलिवूड स्टार आहे. प्रियांका बाल हक्कांसाठी जागतिक युनिसेफची सदिच्छा दूत असून ती नेहमीच आपली सामाजिक बांधिलकी जपत परोपकारिता करत सक्रिय राहिली आहे. तिने अनेक गोष्टींतून भारताचा गौरव केला असून प्रियांकाने नुकतेच परदेशस्थ सेलिब्रिटीजना आणि संपूर्ण जगाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी भारतासोबत उभे राहण्याचे आवाहन केले होते. जागतिक स्तरावर सामाजिक परिवर्तनाचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांका चोप्रा जोनास या ग्लोबल सुपरस्टारने तिच्या विविध कामगिरींनी देशाला वारंवार अभिनंदनित केलंय.

Global star Priyanka Chopra
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा
author img

By

Published : May 18, 2021, 3:13 PM IST

प्रियांका चोप्राने मिस वर्ल्ड जिंकून भारताचे नाव जगभरात गौरवांकित केले. मॉडेलिंग, मग बॉलिवूड आणि आता हॉलिवूडमध्ये स्थिरावलेली ही अभिनेत्री राहते परदेशी पण मनाने आहे संपूर्णतः देशी. बॉलिवूड मध्ये ६०+ चित्रपट करून तिने हॉलिवूडची कास पकडली. तिथेही आपल्या व्यक्तिमत्वाने आणि अभिनयाने सर्वांना भुरळ घातलीय. अमेरिकेतील सुप्रसिद्ध गायक निक जोनाससोबत तिने लग्नगाठ बांधली आणि ती हॉलिवूड आणि बॉलिवूड मधील दरी मिटविण्याचा प्रयत्न करतेय. हल्लीच तिचा अभिनय असलेला 'द व्हाइट टायगर' प्रदर्शित झाला होता आणि त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर भरपूर कौतुक मिळाले होते.

Global star Priyanka Chopra
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनास

‘फोर्ब्स १०० मोस्ट इन्फ्लुएन्शियल’ च्या कव्हरवर झळकणारी ती पहिली भारतीय महिला होती. बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी प्रियंका चोप्रा जोनास सलग दोनदा ‘फोर्ब्स १०० मोस्ट पॉवरफुल विमेन लिस्ट’ मध्ये लागोपाठ दोन वर्ष निवडली गेली होती. या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळविणारी ती पहिली भारतीय कलाकार होती. भारतामध्ये तिच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पद्मश्रीने सन्मान केला गेला. तिच्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या मोठ्या यशस्वी आणि प्रभावी कामगिरीमुळे प्रियंका चोप्रा जोनासला भारतातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बॉलिवूडला जागतिक नकाशावर ठेवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रियंकाला २०१६ मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून पद्मश्री किताब प्रदान करण्यात आला.

Global star Priyanka Chopra
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनास

फॅशन इंडस्ट्रीमधील ‘वोग युएस’ हे अत्यंत प्रतिष्ठित मानले जाणारे मॅगझीन आहे. २०१८ साली या मासिकाच्या मुखपृष्ठावर छापली गेलेली ती पहिली दक्षिण आशियाई महिला होती. म्हणजेच ही ग्लोबल स्टार ‘वोग युएस’ फॅशन मासिकाच्या कव्हर पेजवर वैशिष्ट्यीकृत केलेली पहिली भारतीय महिला होती. प्रियांका चोप्रा ने आपला हॉलिवूड प्रवास ‘क्वांटिको’ या अमेरिकन टेलिव्हिजन मालिकेपासून सुरु केला. तिच्या एफबीआय ऑफिसरच्या भूमिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या भूमिकेसाठी तिला अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले. प्रियंकाने ‘फेव्हरिट ऍक्ट्रेस इन अ न्यू सिरीज’ हा पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली दक्षिण आशियाई महिला होती.

Global star Priyanka Chopra
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनास

युनिसेफच्या स्नोफ्लेक बॉल मध्ये डॅनी केय मानवतावादी पुरस्कार मिळविल्यानंतर लगेचच गेल्या वर्षी मोरोक्कोमधील फेस्टिव्हल इंटरनेशनल डु फिल्म डी माराकेच पुरस्काराने प्रियंका चोप्रा जोनासला गौरविण्यात आले. इथे सन्मान मिळविणारी ती पहिली बॉलिवूड कलाकार होती. अभिनेत्री-निर्माती प्रियांकाचा तिच्या २० वर्षांच्या सिनेमा-प्रवासासाठी गौरव करण्यात आला. प्रियांका चोप्रा जोनास २०२० टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी राजदूत म्हणून निवडली गेलेली पुन्हा एकदा पहिली भारतीय अभिनेत्री ठरली. कार्यक्रमाच्या ४५ व्या आवृत्तीत ५० निमंत्रितांपैकी ती एक होती.

इटलीच्या फ्लॉरेन्स येथील साल्वाटोर फेरागामो संग्रहालयात ‘फूट प्रिंट’ चा मान मिळणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री आहे. तिला फेरागामो संस्थेकडून ‘कस्टम-डिझाईन्ड’ शूज देखील भेट म्हणून मिळाले. प्रियांका चोप्रा जोनास ही एकमेव भारतीय कलाकार आहे जिच्या मेणाचे पुतळे मॅडम तुसाद च्या निरनिराळ्या चार म्युझियममध्ये ठेवण्यात आले आहेत. आशिया खंडासोबतच तिचे मेणाचे पुतळे (वॅक्स स्टॅच्यू) लंडन, न्यू यॉर्क आणि सिडनी येथील मॅडम तुसाद म्युझियममध्ये ठेवण्यात आले आहेत.

Global star Priyanka Chopra
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनास

प्रियांका चोप्रा जोनासचे हॉलिवूडमधील वजन वाढतच असून तिने, आपले यजमान निक जोनास सह, यावर्षी ऑस्कर पुरस्कारांच्या नॉमिनेशन्सची घोषणा केली, आपल्या लंडनमधील घरातून. असा मान मिळणारी ती एकमेवाद्वितीय बॉलिवूड स्टार आहे. प्रियांका बाल हक्कांसाठी जागतिक युनिसेफची सदिच्छा दूत असून ती नेहमीच आपली सामाजिक बांधिलकी जपत परोपकारिता करत सक्रिय राहिली आहे. तिने अनेक गोष्टींतून भारताचा गौरव केला असून प्रियांकाने नुकतेच परदेशस्थ सेलिब्रिटीजना आणि संपूर्ण जगाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी भारतासोबत उभे राहण्याचे आवाहन केले होते.

जागतिक स्तरावर सामाजिक परिवर्तनाचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांका चोप्रा जोनास या ग्लोबल सुपरस्टारने तिच्या विविध कामगिरींनी देशाला वारंवार अभिनंदनित केलंय.
हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळाचा धोका कायम; मुंबईचे मोठे नुकसान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.