मुंबई - 'आपला आपल्यावर कॉन्फिडन्स असला पाहिजे, जग गेले तेल लावत.. असं म्हणणाऱ्या 'गर्ल्स' या चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. 'बॉईज' आणि 'बॉईज २' नंतर ३ मुलींची धमाल गोष्ट मांडणारा 'गर्ल्स' हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अलिकडेच मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.
मती, रुमी, मॅगी या ३ वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या आणि वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या मुलीची ही गोष्ट आहे. दैनंदिन आयुष्य जगताना एका वळणावर जेव्हा त्या एकत्र येतात, तेव्हा आयुष्याकडे बघायची त्यांची दृष्टी कशी बदलते, यावर या चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -'गर्ल्स'च्या नवीन गाण्यात 'गर्ल्स'सोबत 'बॉईज'ही थिरकणार!
'बॉईज' आणि 'बॉईज २' यासारखे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक विशाल देवरुखकर याचा हा तिसरा चित्रपट आहे. यामधून 'बिनधास्त' नंतर गेल्या २० वर्षात मराठी सिनेमांमध्ये न दिसलेली अशी मुलींची गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
अंकिता लांडे, केतकी नारायण, अन्विता फलटणकर या तीन नवोदित अभिनेत्री 'गर्ल्स'द्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यांच्याशिवाय देविका दप्तरदार, पार्थ भालेराव,अतुल काळे,अमोल देशमुख, सुलभा आर्या, किशोरी अंबिये यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. स्वप्नील- महेश ही नवोदित संगीतकरांच्या जोडीने या चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर, समीर सापतीसकर याने २ गाणी स्वरबद्ध केली आहेत. याशिवाय मंदार चोळकर याने या सिनेमातील गाणी लिहिली आहेत. 'आईच्या गावात' आणि 'स्वेग माज्या फाट्यावर' ही गाणी एव्हाना तरुणाईच्या ओठावर रुळली आहेत.
हेही वाचा -बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स'
मुलींचं जगणं त्यांचे गर्ल्स टॉक, त्यांचे प्रश्न, त्यांच्या मनात घडणारी उलथापालथ, त्यावर त्यांनी स्वतः शोधलेली उत्तरे हे सारं काही 'गर्ल्स'च्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या २९ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.