ETV Bharat / sitara

'फँड्री'चा झब्या 'फ्री हिट' ठोकण्यासाठी सज्ज, 17 डिसेंबरला थिएटरात देणार 'दणका' - 'फ्री हिट दणका'ची प्रदर्शनाची तारीख

मराठी चित्रपट 'फ्री हिट दणका'ची प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. या सिनेमाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करत 'फ्री हिट दणका'च्या टीमने हा सिनेमा 17 डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.

'फ्री हिट दणका'ची प्रदर्शनाची तारीख
'फ्री हिट दणका'ची प्रदर्शनाची तारीख
author img

By

Published : Nov 25, 2021, 8:28 PM IST

मुंबई - कोरोना संक्रमणानंतर मनोरंजनसृष्टी आता सावरली आहे. निर्मातेसुद्धा आपले चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित व्हावेत यासाठी आग्रही आहेत. त्यामुळेच चित्रपट प्रदर्शनाच्या तारखादेखील घोषित होऊ लागल्या आहेत. मराठी चित्रपट 'फ्री हिट दणका'ची देखील प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. या सिनेमाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करत 'फ्री हिट दणका'च्या टीमने हा सिनेमा 17 डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

अपूर्वा एस. या अभिनेत्रीसोबत नायक म्हणून फॅन्ड्री फेम अभिनेता सोमनाथ अवघडे दिसणार आहे. सिनेमा क्रिकेटच्या अवतीभवती फिरणारा असल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरवरुन स्पष्ट दिसते. ट्रेलरमध्ये उघडेवाडी आणि निगडेवाडी या दोन गावातील संघर्ष पाहायला मिळणार आहे. या दोन गावात वैर आहे. दोन गावात लग्न व्यवहार होत नाही. अशावेळी या दोन गावातील प्रियकर प्रेमिकांची जोडी लग्नासाठी उत्सुक आहे. याचा फैसला दोन गावाच्या संघातील क्रिकेटच्या सामन्यातून होणार आहे. असा मनोरंजक विषय असलेल्या या ट्रेलरमधील संवाद द्विअर्थी वापरलेले दिसतात. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रेक्षकांना समोर ठेवून विषयाची मांडणी करण्यात आल्याचे दिसत आहे.

यापूर्वीच सैराट या सिनेमातील अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या) ही हिट जोडी फ्री हिटमध्ये झळकणार असल्याची गोषणा करण्यात आली होती. फँड्री या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेला सोमनाथ अवघडे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. ही सर्व मंडळी गुणी दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या हाताखालून गेल्यामुळे त्यांच्या अभिनयाचा पाया घट्ट झालेला आहे याबद्दल शंका नाही.

'फँड्री'चा झब्या 'फ्री हिट' ठोकण्यासाठी सज्ज

अतुल रामचंद्र तरडे आणि आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे, आणि सुनिल मगरे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर, नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे आणि सत्यम तरडे सहनिर्माते आहेत. एसजीएम फिल्म्स प्रस्तुत 'फ्री हिट दणका' या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि पटकथा सुनिल मगरे यांची असून संजय नवगिरे यांनी चित्रपटाचे संवाद आणि गीतलेखन केले आहे. सिनेमाला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीतबद्ध केले असून चित्रपटाचे छायाचित्रण हजरत शेख (वल्ली) यांचे आहे.

हेही वाचा - वरुण धवनचा 'भेडिया' पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये होणार रिलीज, पोस्टर जारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.