मुंबई - रेमो डिसूझा लवकरच 'एबीसीडी'चा तिसरा भाग म्हणजेच 'एबीसीडी ३' प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. हा चित्रपट डान्सवर आधारित असणार असून यात वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. नुकतीच चित्रपटाची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
वरुण धवनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर करत २०१९ मध्ये रूल ब्रेकर्स येत असल्याचं कॅप्शन याला दिलं आहे. मात्र, या फोटोत वरूणचा चेहरा पाहायला मिळत नाही. त्यामुळे त्याच्या लूकसाठी चाहत्यांना आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
चित्रपटात श्रद्धा कपूर आणि वरूण धवनशिवाय प्रभूदेवा आणि नोरा फतेही यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला काही दिवसांपूर्वीच अमृतसरमध्ये सुरूवात झाली असून एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान वरूणच्या गुडघ्याला दुखापतदेखील झाली होती. ८ नोव्हेंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.