मुंबई - अभिनेता अजय देवगणचा आगामी 'भुज : द प्राईड ऑफ इंडिया' चित्रपटातील डॅशिंगलूक रिलीज झाला आहे. यात अजय स्क्वाड्रन लिडरची भूमिका साकारणार आहे. अजयच्या मागे धुसर फायटर जेटही दिसत आहे.
-
First look... #AjayDevgn in #BhujThePrideOfIndia... Directed by Abhishek Dudhaiya... 14 Aug 2020 release. pic.twitter.com/NRo95gOGsO
— taran adarsh (@taran_adarsh) January 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">First look... #AjayDevgn in #BhujThePrideOfIndia... Directed by Abhishek Dudhaiya... 14 Aug 2020 release. pic.twitter.com/NRo95gOGsO
— taran adarsh (@taran_adarsh) January 2, 2020First look... #AjayDevgn in #BhujThePrideOfIndia... Directed by Abhishek Dudhaiya... 14 Aug 2020 release. pic.twitter.com/NRo95gOGsO
— taran adarsh (@taran_adarsh) January 2, 2020
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर हँडवर फोटो शेअर करीत लिहिलंय, 'फर्स्ट लुक... #अजय देवगन #भुजः द प्राइड ऑफ इंडिया मध्ये... अभिषेक दुधाइया द्वारा दिग्दर्शित... १४ऑगस्ट २०२० ला रिलीज.'
अजय देवगणच्या चाहत्यांसाठी 'भुज : द प्राईड ऑफ इंडिया' हा चित्रपट पर्वणी ठरणार आहे. 'तानाजीः द अनसंग वॉरियर' हा अजयचा आगामी चित्रपट १० जानेवारीला रिलीज होतोय. त्याच्या पाठोपाठ नव्या सिनेमाची घोषणा झाल्यामुळे नव्या वर्षात दोन मोठे धमाके करायला अजय देवगण सज्ज झालाय.