ETV Bharat / sitara

बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'शुभ मंगल ज्यादा सावधान' vs 'भूत', कोण मारली बाजी?

विकी कौशल आणि आयुष्मान खुराना यांचे यावर्षीचे हे पहिलेच चित्रपट आहेत. त्यामुळे दोन्ही चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली.

Shubh Mangal zyada Savdhan First day box office collection, Bhoot First day box office collection, Shubh Mangal zyada Savdhan Beat bhoot, SMZS at box office, Bhoot film At box office, Ayushmaan Khuraana news, Vicky Koushal news
बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'शुभ मंगल ज्यादा सावधान' vs 'भूत', कोणी मारली बाजी?
author img

By

Published : Feb 22, 2020, 5:02 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये बॅक टू बॅक हिट चित्रपट देणारा आयुष्मान खुराना आणि अल्पावधितच लोकप्रिय झालेला विकी कौशल यांचे चित्रपट २१ फेब्रुवारीला सिनेमागृहात दाखल झाले आहेत. आयुष्मानचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' तर, विकी कौशलचा 'भूत' या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, आकडेवारीमध्ये आयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाने 'भूत' चित्रपटाला मागे टाकले आहे.

दोन्ही चित्रपटांच्या पहिल्या दिवशीचे आकडे समोर आले आहेत. विकी कौशल आणि आयुष्मान खुराना यांचे यावर्षीचे हे पहिलेच चित्रपट आहेत. त्यामुळे दोन्ही चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली. ट्रेलरवरही सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली होती.

हेही वाचा -वाह!! डोनाल्ड ट्रम्पनी केले 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चे कौतुक

आयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाने पहिल्या दिवशी ९.५५ कोटीची दमदार कमाई केली आहे. तर, 'भूत' चित्रपटाने ५.१० कोटीची कमाई केली आहे. 'भूत' चित्रपटात विकी कौशलसोबत भूमी पेडणेकर, आशुतोष राणा यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन भानु प्रताप सिंग यांनी केले आहे.

'भूत' हा चित्रपट विकीचा पहिलाच हॉरर चित्रपट आहे. हा चित्रपट २००० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे. तर, आयुष्मानचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपट समलैंगिक जोडप्याच्या प्रेमकथेवर आधारित आहे. आता आठवड्याच्या शेवटपर्यंत हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

  • #Bhoot opens on expected lines... The genre has its loyal audience in mass pockets + with strong title-value, should’ve opened to higher numbers... #MahaShivratri partial holiday also contribute to its total... Needs to increase speed on Day 2 and 3... Fri ₹ 5.10 cr. #India biz.

    — taran adarsh (@taran_adarsh) February 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -Public review: विकी कौशलच्या 'भूत' परफॉर्मन्सने जिंकली अनेकांचे मने

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.