ETV Bharat / sitara

मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२०च्या पाचव्या पर्वाची झाली घोषणा! - फिल्मफेअर देशातील मनोरंजन क्षेत्राच्या केंद्रस्थानी

गेल्या काही वर्षांपासून फिल्मफेअर मराठीचे आयोजन केले जाऊन मराठी कलाकार व कलाकृतींचा आदराने सन्मान केला जातो. कोरोना संक्रमणामुळे यावर्षी तो होणार की नाही याबद्दल शंका होती परंतु आता तो आभासी पद्धतीने सादर होणार आहे.

Marathi Filmfare Awards 2020
मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्स
author img

By

Published : Feb 26, 2021, 1:27 PM IST

मुंबई - आपल्या देशातील 'ऑस्कर' म्हणून ओळखला जाणाऱ्या फिल्मफेअर अवॉर्डसची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतात. पूर्वी मराठी चित्रपटांसाठी असलेले अवॉर्डस सुरुवातीलाच पटापट उरकून घेतले जात. परंतु गेल्या काही वर्षांपासून फिल्मफेअर मराठीचे आयोजन केले जाऊन मराठी कलाकार व कलाकृतींचा आदराने सन्मान केला जातो. कोरोना संक्रमणामुळे यावर्षी तो होणार की नाही याबद्दल शंका होती परंतु आता तो आभासी पद्धतीने सादर होणार आहे.

Marathi Filmfare Awards 2020
मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२०
मराठी मनोरंजन क्षेत्राची वेगवान प्रगती साजरी करत या पुरस्कार सोहळ्यात भारतातील एका सर्वात जुन्या सिने सृष्टीतील सिनेमॅटिक प्रतिभेला नावाजण्यात येणार आहे.अगदी स्थापनेपासूनच फिल्मफेअर देशातील मनोरंजन क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहे. त्यांनी या क्षेत्रातील उत्कृष्ट प्रतिभेचा नेहमीच गौरव, सन्मान केला आहे. फिल्मफेअर पुन्हा येत आहे, फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२० चे पाचवे पर्व घेऊन. त्यामुळे जगभरातील मराठी सिनेमाच्या लाखो चाहत्यांना त्याच दिवशी सायं. ७ वाजता हा सोहळा पाहता येईल.मराठी ओटीटीचे संस्थापक आणि चेअरमन अक्षय बर्दापूरकर म्हणाले, "मराठी इंडस्ट्रीत बनलेला सिनेमा हा फक्त मराठी प्रेक्षकांसाठी नसतो तो भारतभरासाठी असतो. देशाच्या प्रत्येक भागात, या प्रवासात पहिले पाऊल टाकताना फिल्मफेअर हे अगदी सुयोग्य भागीदार आहेत."विविध जॉनरमध्ये प्रयोग करत, कथा सांगण्याच्या विविध पद्धतींचा अवलंब करत मराठी मनोरंजन सृष्टी प्रेक्षकांना सातत्याने आकर्षित करत आहे. यामुळेच ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या समीर विद्वांस दिग्दर्शित आनंदी गोपाळ या सिनेमाला विविध विभागांमध्ये तब्बल १६ मानांकनं मिळाली आहेत. अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्या गर्लफ्रेंड या अत्यंत सुंदर प्रेमकथेला १५ नामांकनं आहेत. अमेय वाघ, अंकुश चौधरी, भालचंद्र कदम, दीपक डोब्रियाल, ललित प्रभाकर, प्रणव रावराणे अशी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी अत्यंत चुरशीची लढत आहे. अभिनेत्रींमध्ये भाग्यश्री मिलिंद, मृण्मयी देशपांडे, मुक्ता बर्वे, नंदिता पाटकर, सायली संजीव, सोनाली कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकन मिळालं आहे.
Marathi Filmfare Awards 2020
मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२०
या घोषणेबद्दल वर्ल्डवाईड मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक लांबा म्हणाले, "मराठी सिनेसृष्टीने कायमच बंधने, सीमारेषा झुगारून देत कामगिरी केली आहे आणि फिल्मफेअरमध्ये आम्ही या प्रयत्नांना साजरे करण्यास, २०१९ मधील काही अतुलनीय परफॉर्मन्सेसवर पुन्हा एकदा प्रकाशझोत टाकण्यास उत्सुक आहोत."अभिनेत्री अमृता खानविलकर म्हणाली, "सर्वप्रथम मी संपूर्ण फिल्मफेअर कुटुंबाचं मराठी सिनेमाचं आणखी एक वर्ष साजरं करत असल्याबद्दल अभिनंदन करते. या ख्यातनाम ब्लॅक लेडीसाठी अधिकाधिक मेहनत घेण्याचं प्रोत्साहन, उत्साह यामुळे मराठी इंडस्ट्रीला मिळतो."मराठी सिनेमावर असलेलं आपलं प्रेम व्यक्त करताना अमेय वाघ म्हणाला, "कित्येक वर्षांपासून फिल्मफेअरने भारतीय सिनेमाला साजरं केलं आहे, सन्मान केला आहे आणि आता मराठी सिनेमाच्या लाखो चाहत्यांसाठी हा अनुभव जीवंत करण्याची वेळ आली आहे. फिल्मफेअरसह आपल्या या सिनेसृष्टीतील चमकदार, सदाबहार प्रतिभेला साजरं करताना मला आनंद होत आहे."हा सोहळा प्लॅनेट मराठीतर्फे सादर होईल तर फेसबुक ग्लोबल डिजिटल पार्टनर आहेत आणि कलर्स मराठी एक्स्लुसिव्ह टेलिकास्ट पार्टनर आहेत.प्लॅनेट मराठी प्रेझेंट्स फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२० कलर्स मराठीवर १४ मार्च २०२१ रोजी सायं. ७ वाजता प्रसारित केला जाईल. हा सोहळा फेसबुकवर @Filmfare इथे सिम्युलकास्टेड करण्यात येणार आहे.

हेही वाचा - 'स्पायडर मॅन 3'चे अधिकृत नाव असेल ‘स्पायडर मॅनः नो वे होम’

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.