मुंबई - अभिनेता फरहान अख्तर लवकरच 'तुफान' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'भाग मिल्खा भाग' चित्रपटानंतर दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात फरहान 'बॉक्सर'ची भूमिका साकारत आहे. यासाठी तो अथक मेहनत घेत आहे. अलिकडेच त्याने या चित्रपटाची तयारी करत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
![Farhan Akhtar share Toofan in the making picture](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3527856_f1.jpg)
या चित्रपटाचे दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले होते, की 'फरहान आणि मी या चित्रपटासाठी फार उत्सुक आहोत. ६ वर्षांनंतर आम्ही या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. अंजुम राजाबली हे या चित्रपटाच्या कथानकावर काम करत आहेत', असेही त्यांनी सांगितले होते.
फरहान या चित्रपटाचे अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असतो. 'तुफान'ची तयारी करत असल्याचा हा फोटो आहे. या फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.