मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या 'सूर्यवंशी' या चित्रपटामध्ये मूख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, चित्रपटाच्या सेटवर अक्षय आणि रोहितमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यातला वाद खुद्द करण जोहरही सोडवू शकत नसल्याचं त्यानेच म्हटलं आहे.
खरंतर, 'सूर्यवंशी'च्या सेटवर अक्षय आणि रोहितचा वाद झाल्याच्या वृत्तामध्ये काहीही तथ्य नसल्याचं समोर आले आहे. काही माध्यमांमध्ये त्या दोघांमध्ये भांडण झाल्याचं समोर आलं होतं. मात्र, अक्षयने एक व्हिडिओ शेअर करून दोघांच्या वादाच्या बातम्या या निव्वळ अफवा असल्याचं सांगितलं आहे.
-
#BreakingNews - A fallout which might just make your day 🙃 pic.twitter.com/gH2jgTQqhT
— Akshay Kumar (@akshaykumar) November 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#BreakingNews - A fallout which might just make your day 🙃 pic.twitter.com/gH2jgTQqhT
— Akshay Kumar (@akshaykumar) November 12, 2019#BreakingNews - A fallout which might just make your day 🙃 pic.twitter.com/gH2jgTQqhT
— Akshay Kumar (@akshaykumar) November 12, 2019
हेही वाचा -'केटी पेरी फिव्हर': पाहा जॅकलिनची केटीसोबतची खास सेल्फी
त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित आणि अक्षय खोटी खोटी हाणामारी करताना पाहायला मिळतात. यामध्ये अक्षय म्हणतो, की 'आपल्याला भांडण करावंच लागेल'.
कॅटरिना कैफही या व्हिडिओत पाहायला मिळते.
दिग्दर्शक करण जोहर यानेही या व्हिडिओवर 'हा वाद तर मी देखील सोडवू शकत नाही, अशी प्रतीक्रिया त्याने दिली आहे.
-
😉😂😂😉 this is something even I can’t mediate!!!! @akshaykumar #RohitShetty #KatrinaKaif https://t.co/U78eh3xwgV
— Karan Johar (@karanjohar) November 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">😉😂😂😉 this is something even I can’t mediate!!!! @akshaykumar #RohitShetty #KatrinaKaif https://t.co/U78eh3xwgV
— Karan Johar (@karanjohar) November 12, 2019😉😂😂😉 this is something even I can’t mediate!!!! @akshaykumar #RohitShetty #KatrinaKaif https://t.co/U78eh3xwgV
— Karan Johar (@karanjohar) November 12, 2019
हेही वाचा -'वीर जारा'चे १५ वर्ष पूर्ण, राणी मुखर्जीने उलगडल्या आठवणी