ETV Bharat / sitara

'बिंग बीं'सोबत काम करताना इमरानची व्हायची बोलती बंद, म्हणून करायचा 'हे' काम - अन्नु कपूर

'चेहरे' चित्रपटात इमरान एका उद्योगपतीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, बिग बी पुन्हा एकदा वकीलाच्या भूमिकेत झळकणार आहेत. इमरानने यापूर्वी त्यांच्यासोबत भूमिका साकारली नव्हती. त्यामुळे त्यांच्यासमोर तो सुरुवातीला नर्व्हस होत असे.

'बिंग बीं'सोबत काम करताना इमरानची व्हायची बोलती बंद, म्हणून करायचा 'हे' काम
author img

By

Published : Jul 26, 2019, 8:29 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी हा लवकरच महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'चेहरे' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद पंडित हे करत आहेत. हा एक सस्पेंस थ्रिलर चित्रपट असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता आहे. इमरान हाश्मी पहिल्यांदाच बिग बींसोबत भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे इमरान खूप उत्साही होता. मात्र, त्यांच्यासमोर त्याची बोलती बंद होत असे. खुद्द दिग्दर्शक आनंग पंडित यांनीच याबाबत एक खुलासा केला आहे.

'चेहरे' चित्रपटात इमरान एका उद्योगपतीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, बिग बी पुन्हा एकदा वकीलाच्या भूमिकेत झळकणार आहेत. इमरानने यापूर्वी त्यांच्यासोबत भूमिका साकारली नव्हती. त्यामुळे त्यांच्यासमोर तो सुरुवातीला नर्व्हस होत असे. मात्र, त्यांच्यासोबत आपली भूमिका उत्कृष्ट व्हावी, यासाठी इमरान सेटवर येताना चित्रपटाचे डायलॉग पाठ करुन येत असे.

अमिताभ बच्चन हे वेळेचे खूप काटेकोरपणे पालन करतात. त्यामुळे ते सेटवर नेहमी वेळेत हजर राहत असत. त्यांनी या चित्रपटाचा तब्बल १४ मिनिटांचा शॉट एकाच टेकमध्ये पूर्ण केला होता.
या चित्रपटामध्ये अन्नु कपूर, कृती खारबांदा, रघुवीर यादव आणि रिया चक्रवर्ती यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाच्या सेटवर सर्व कलाकार कुटुंबाप्रमाणे राहत होते, असेही आनंद पंडित यांनी सांगितले. कलाकारांची एकमेकांसोबत जबरदस्त बॉन्डिंग होती. त्यामुळे आम्ही चार दिवस अगोदरच शूटिंग पूर्ण करु शकलो, असेही ते म्हणाले.

'चेहरे' चित्रपटात अमिताभ यांचा हटके लूक पाहायला मिळणार आहे. चित्रपटाप्रमाणेच त्यांचा नवा लूकदेखील सध्या चर्चेत आहे. २१ फेब्रुवारी २०२० रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.