ETV Bharat / sitara

माळीणची ५ वर्षे : 'तो' काळा दिवस सिनेपडद्यावर होणार जिवंत - Ek Hota Malin

बरोबर ५ वर्षांपूर्वी... ३० जुलै २०१४ रोजी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी ती दुर्घटना घडली .. हाच तो काळा दिवस... आणि ते दुर्दैवी गांव होतं माळीण. खरं तरं हे सगळचं सुन्न करणार होतं. याच प्रकोपाच वास्तववादी चित्रण आपल्या समोर येत आहे ... 'एक होतं माळीण' या चित्रपटाच्या माध्यमातून.

एक होतं माळीण
author img

By

Published : Jul 30, 2019, 8:35 AM IST

मुंबई - एक गाव, सुखवस्तू, टुमदार, चोहोबाजूंनी डोंगरांनी वेढलेलं, माणूसपण जपणारं, आणि जगवणारं. या गावात एकूण 67 घरं... गावातल्या जवळपास सगळ्याच कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती. कमळजा आई आणि वर्सू आई या गावाची देवी. भीमाशंकर जवळ असल्यानं धार्मिक वातावरण गावात... साधारण गांव असत तसचं हे गांव... नव्या आशांसह आयुष्य जगणाऱ्या माणसांचं हे गांव. गावची लोकसंख्या अवघी 350-400 च्या आसपास... गांवांत कोणतंही आधुनिक संवादाचं माध्यम नाही, थोडक्यात इंटरनेट सुविधा नाही. त्यामुळे एस.टी. आणि वडाप हाच काय तो माहिती इकडून तिकडे पोहोचवण्याचा मार्ग.

Ek Hota Malin
एक होतं माळीण

नेहमी सारखाच तो दिवस होता. सकाळी ग्रामस्थांची नेहमीची लगबग सुरू झाली. कोणी पुण्याला जाण्यासाठी घरं सोडल, कोणी शेतावर जाण्यासाठी चहा पाणी करून निघालं, कोणी पाऊस खूप असल्यानं गावात वढ्याचा पूर बघण्यासाठी निघाला. चिल्ली-पिल्ली शाळेत जाण्याच्या तयारीत... गावात प्राथमिक शाळा... कोणी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचलं होतं... असा सर्वसाधारण दिवस सुरू झाला होता... मात्र, कोणालाच कल्पना नव्हती काळ दबा धरून बसला होता... या सगळ्या रोजच्या जगण्यात अचानक काळा दिवस येणार होता... अनेकांच्या आयुष्यातला तो अखेरचा दिवस, अखेरचा क्षण ठरणार होता... काही कळायच्या आत... काळानं डाव साधला... डोंगरातून स्फोट झाल्यासारखा आवाज झाला... आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं...

डोंगरावरून कोसळेलेली दरड अख्खं गांव तिच्या सोबत जमिनीच्या पोटात घेत शांत झाली... जे यातून बचावले त्यांना काहीच सूचत नव्हतं. स्वतःच्या घराच्या खाणा खुणा शोधणाऱ्या नजरा भिरभिरतं होत्या. आपल घर, आपली माणस, जीतं आपलं सार-सार काही होतं... पण आता नाही... हे कळायला आणि पचवायला कोणाचचं मन धजावत नव्हतं. पण यातही कुठेतरी आशेचा किरण असणार, आपल्यापैकीचं कोणीतरी आपल्याला शोधत असणार याच भान येताच मदतीसाठी सगळेच जमेल, तसे त्या चिखलात उतरले. सजीवत्वाचा अंश कुठे आहे का, याचा शोध घेऊ लागले. मग ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचं लक्षात आल्यावर मदतीचा ओघ सुरू झाला... हे सगळं घडलं बरोबर ५ वर्षांपूर्वी... ३० जुलै २०१४ रोजी सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी .. हाच तो काळा दिवस... आणि हे दुर्दैवी गांव होतं माळीण.

खरं तरं हे सगळचं सुन्न करणार होतं. याच प्रकोपाच वास्तववादी चित्रण आपल्या समोर येत आहे ... 'एक होतं माळीण' या चित्रपटाच्या माध्यमातून. या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलयं राजू राणे आणि दत्तात्रत गायकर यांनी. या चित्रपटाची निर्मिती केली आहे संतोष म्हात्रे यांनी. वास्तवाच्या जवळ जाणारी ही कलाकृती ड्रीमडॉट क्रिएशन आपल्या समोर लवकरच घेऊन येत आहे. मराठीमध्ये प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात भव्य सेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजे VFX चा वापर करण्यात आला आहे. नुकतच या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं असून लवकरच हा सिनेमा आपल्या भेटीला येईल.

Intro:एक गांव, सुखवस्तू, टुमदार, चोहोबाजूंनी डोंगरांनी वेढलेलं, माणूसपण जपणारं, आणि जगवणारं, या गावात एकूण 67 घरं... गावातल्या जवळपास सगळ्याच कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती. कमळजा आई आणि वर्सू आई या गावाची देवी... भिमाशंकर जवळ असल्यानं धार्मिक वातावरण गावात... साधारण गांव असत तसचं हे गांव... नव्या आशांसह आयुष्य जगणाऱ्या माणसांचं हे गांव. गावची लोकसंख्या अवघी 350-400 च्या आसपास... गांवांत कोणतंही आधुनिक संवादाचं माध्यम नाही, थोडक्यात इंटरनेट सुविधा नाही... त्यामुळे एस.टी. आणि वडाप हाच काय तो माहिती इकडून तिकडे पोहोचवण्याचा मार्ग.
नेहमी सारखाच तो दिवस होता.सकाळी ग्रामस्थांची नेहमीची लगबग सुरू झाली।
कोणी पुण्याला जाण्यासाठी घरं सोडल, कोणी शेतावर जाण्यासाठी चहा पाणी करून निघालं, कोणी पाऊस खूप असल्यानं गावात वढ्याचा पुर बघण्यासाठी निघाला .. चिल्ली पिल्ली शाळेत जाण्याच्या तयारीत... गावात प्राथमिक शाळा... कोणी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचलं होतं... असा सर्वसाधारण दिवस सुरू झाला होता... मात्र कोणालाच कल्पना नव्हती काळ दबा धरून बसला होता... या सगळ्या रोजच्या जगण्यात अचानक काळा दिवस येणार होता... अनेकांच्या आयुष्यातला तो अखेरचा दिवस, अखेरचा क्षण ठरणार होता... काही कळायच्या आत... काळानं डाव साधला... डोंगरातून स्फोट झाल्यासारखा आवाज झाला... आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं... डोंगरावरून कोसळेलेली दरड अख्खं गांव तिच्या सोबत जमिनीच्या पोटात घेत शांत झाली... जे यातून बचावले त्यांना काहीच सुचत नव्हतं... स्वतःच्या घराच्या खाणा खुणा शोधणाऱ्या नजरा भिरभिरतं होत्या... आपल घर, आपली माणस, जीत आपल सार सार काही होतं... पण आता नाही... हे कळायला आणि पचवायला कोणाचचं मन धजावत नव्हत... पण यातही कुठेतरी आशेचा किरण असणार, आपल्यापैकीचं कोणीतरी आपल्याला शोधत असणार याच भान येताच मदतीसाठी सगळेच जमेल तसे त्या चिखलात उतरले... सजीवत्वाचा अंश कुठे आहे का याचा शोध घेऊ लागले... मग ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचं लक्षात आल्यावर मदतीचा ओघ सुरू झाला... हे सगळं घडलं बरोब्बर ५ वर्षांपूर्वी... ३० जुलै २०१४ रोजी सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी .. हाच तो काळा दिवस... आणि हे दुर्दैवी गांव होतं माळीण... खरं तरं हे सगळचं सुन्न करणार होतं ... याच प्रकोपाच वास्तववादी चित्रण आपल्या समोर येत आहे ... एक होतं माळीण या चित्रपटाच्या माध्यमातून... या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलयं राजू राणे आणि दत्तात्रत गायकर यांनीया चित्रपटाची निर्मिती केली आहे संतोष म्हात्रे यांनी .. वास्तवाच्या जवळ जाणारी ही कलाकृती ड्रीमडॉट क्रिएशन आपल्या समोर लवकरच घेऊन येत आहे.. मराठी मध्ये प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात भव्य सेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजे VFX चा वापर करण्यात आला आहे.

नुकतच या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं असून लवकरच हा सिनेमा आपल्या भेटीला येईल. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.