आधुनिक काळात ‘ब्रेक-अप’ हा शब्द खूपच कॉमन झाला आहे. तरीही ज्यांचा ‘ब्रेक-अप’ होतो ते भावनिक हिंदोळ्यावर झुलत असतात. अशावेळी कोणीतरी समजूतदार भेटावा लागतो जो फक्त ‘ऐकू’ शकेल. पण ‘ब्रेक-अप’ झालेले तेच दोन प्रेमी अचानकपणे एकाच ठिकाणी भेटले तर काय होईल? दिग्दर्शक शशांक शेखर सिंग याने आपल्या पहिल्या शॉर्ट फिल्म ‘दोबारा अलविदा’मध्ये अशीच गोष्ट कथित केली असून दोन ब्रेक-अप झालेल्या प्रेमींच्या भूमिकेत स्वरा भास्कर आणि गुलशन देवैया सारखे तगडे कलाकार आहेत.
रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्मस् प्रस्तुत ‘दोबारा अलविदा’ मध्ये स्वरा भास्कर आणि गुलशन देवैया आपल्या सहजसुंदर अभिनयातून ब्रेक-अप झालेल्या कपलच्या नात्यातील चढ-उतार समर्थपणे दर्शवितात. दोन दुरावलेल्या प्रेमींची एकाच कॅब राईडमध्ये होणार्या भेटीबद्दलच्या कथेद्वारे शशांक शेखर सिंग दिग्दशर्क म्हणून पदार्पण करीत असून आधुनिक काळातील नातेसंबंध व त्यामधील असणारी अस्थिरता अधोरेखित करण्यात आली आहे. दुरावलेले प्रेमी एकाच कॅबमध्ये अनपेक्षितपणे भेटल्यानंतर होणारा आठवणींचा प्रवास यावर हा लघुपट आधारित आहे. या लघुपटाची रंजक कथा एकाच कॅबमधून प्रवास करणार्या अचानकपणे भेटलेल्या दोन दुरावलेल्या प्रेमींभोवती फिरते. त्यानंतर दडपलेल्या भावनांचे होणारे चढ-उतार आणि दुरावलेल्या प्रेमींमध्ये पुन्हा एकदा निर्माण होणारी ओढ याबाबत उत्सुकता निर्माण होते.
‘दोबारा अलविदा’ बाबत बोलताना स्वरा भास्कर म्हणाली की, “हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे, कारण यामध्ये नातेसंबंध संपल्यानंतर सहसा दडपलेल्या भावनांचे पैलू समोर येत नसतात त्यावर भाष्य केलं गेलं आहे. आपल्या आयुष्यातील एखादी गोष्ट ‘क्लोज’ झाल्यावर क्वचितच आपण त्या गोष्टीचा सामना करतो. मला आनंद आहे की, रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्मस ने अशी अनोखी आधुनिक कथा सांगण्यासाठी व प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी व्यासपीठ दिले आहे.”
अभिनेता गुलशन देवैया म्हणाला, ‘ही कथा काही विशिष्ट अशा प्रकारच्या भावनांशी संबंधित आहे ज्या सर्वसाधारणपणे दडपून टाकल्या जातात किंवा बाजूला सारल्या जातात. जोपर्यंत आपल्याला त्यांच्याशी अचानक सामना करण्यास भाग पडत नाही तोपर्यंत त्यातील गांभीर्य उलगडत नाही. या कथेत अनपेक्षितपणे दोन व्यक्तींना परस्परांशी भावनिकदृष्ट्या जोडले जाण्यासाठी एक संधी मिळते. अशा प्रकारची अतिशय उत्तम आणि समकालीन विषयांशी संबंधित कथाकारांसाठी सक्षम व्यासपीठ मिळाले आहे. या लघुपटामुळे उत्कृष्ट दर्जाचे निर्माते, कलाकार व तंत्रज्ञ एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत.”
शाहबाझ खान यांची निर्मिती लाभलेल्या ‘दोबारा अलविदा’ या चित्रपटाला प्रख्यात संगीत दिग्दर्शक कृष्णा सोलो यांचे संगीत लाभले असून मानस मित्तल यांनी चित्रपटाचे संपादन केले आहे.
हेही वाचा - शीरॉक्स' उपक्रमासाठी जॅकलिन फर्नांडीजला 'टाइम्स 40 अंडर 40'च्या यादीमध्ये स्थान!