सगळीकडेच रोषणाई, कंदिल, दिव्यांची आरास, तोरणं अस प्रसन्न वातावरण आहे. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सणाचं म्हणजेच दिवाळीच आगमन झालेलं आहे...मग यात तुमच्या लाडक्या मालिका का बरं मागे राहतील... 'कलर्स मराठी'वरील 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' आणि 'जीव झाला येडापिसा' या मालिकामध्ये दिवाळी सेलिब्रेशन मोठ्या उत्साहात पार पडलं.
'जीव झाला येडापिसा' या मालिकेमध्ये सिध्दी–शिवा आणि 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेमध्ये अनु–सिध्दार्थ यांचा लग्नानंतरचा हा पहिलाच दिवाळसण आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस ते मोठ्या आनंदात साजरा करताना दिसतात...पाडवा, लक्ष्मीपूजन..सिध्दी–शिवा आणि अनू–सिध्दार्थचा हा पहिला पाडवा भलताच खास आहे. तर या दोन्ही नाईकांची भाऊबीज देखील फारच खास आहे. सिध्दार्थ–संयु, शिवा–सोनीची या भावाबहिनीच्या जोड्या मोठ्या उत्साहात आणि आनंदात हा सण साजरा केला आहे. 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' आणि 'जीव झाला येडापिसा' या मालिकांचे दिवाळी स्पेशल भाग चांगलेच रंगलेत. या एपिसोडचा माध्यमातून तुमची आमची दिवाळी नक्कीच स्पेशल ठरेल हे काही वेगळं सांगायला नको..
सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये आता अनुला देखील सिध्दार्थबद्दल प्रेम वाटू लागले आहे... आजवर सिध्दार्थने अनुजवळ अनेकदा त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पण आता अनु तिच्या मनातल्या भावना सिध्दार्थला पहिल्या पाडव्याच्या निमित्ताने सांगू शकेल की सान्वी नवी खेळी खेळेल हे बघणे रंजक असणार आहे. सिध्दी आणि शिवाच्या नात्यात अजूनही कटुता आहे. त्याचा फायदा मंगल घेत आहे… दिवाळी कशी साजरी होईल, पाडवा कसा करतील? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.