मुंबई - प्रसिध्द पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ याच्याशी निर्माते अली अब्बास यांनी संपर्क साधला आहे. दिलजित दोसांझ अली अब्बास जफरच्या आगामी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये परतण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
वृत्तानुसार, अली अब्बास जफर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार नाही तर निर्माता म्हणून काम करणार आहेत. या महिन्यात फिल्म सिटीमध्ये चित्रपटाचे सुटिंग सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
अली अब्बास जफर यांना शीखविरोधी दंगलीवर बर्याच काळापासून चित्रपट बनवायचा होता. अद्याप शीर्षक न ठरलेल्या या चित्रपटाची सुरूवात नवीन वर्षात करण्याचे त्यांनी ठरवले होते. जफर स्वतः वैयक्तिकरित्या सेट डिझायनिंगकडे पहात आहेत. ८० च्या दशकातील भारत दिसण्यासाठी ते सेट उभा करीत असून यात दोन मजली चाळ उभी करण्यात येत आहे.
हेही वाचा - अक्षय कुमारने शेअर केला नव्या वर्षातील पहिल्या सुर्योदयाचा व्हिडिओ
दरम्यान, दिलजीत आगामी 'जोडी' या पंजाब चित्रपटाद्वारे निर्माता बनला आहे. अंबरदीप सिंग लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाची सहनिर्मिती अमरिंदर गिल आणि कारज गिल यांनी केली आहे.
हेही वाचा - 'दृष्यम २' चा टीझर रिलीज, ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रीमियर