ETV Bharat / sitara

बिग बॉसच्या घरातून दिगंबर नाईक बाहेर, आयटम गर्ल हिना पांचाळची वाईल्ड कार्ड एन्ट्री - hina panchal

बिग बॉसच्या घरातून शिस्तभंगाची कारवाई करत शिवानी सुर्वेला घराबाहेर काढल्यानंतर आता या दिगंबर नाईक हे या घरातून बाहेर पडले आहेत.

दिगंबर नाईक
author img

By

Published : Jun 17, 2019, 10:14 AM IST

मुंबई - छोट्या पडद्यावर 'बिग बॉस मराठी'च्या घरात दिवसेंदिवस स्पर्धकांमधील चुरस रंगताना दिसतेय. आता घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्याच नॉमिनेशनमध्ये मैथिली जावकर घराबाहेर पडली. आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर पडावे लागत आहे. या आठवड्यामध्ये दिगंबर नाईक यांना घराबाहेर पडावे लागले आहे.

या आठवड्यामध्ये नेहा शितोळे, विणा जगताप, किशोरी शहाणे, दिगंबर नाईक, माधव देवचके नॉमिनेशन होते. ज्यामध्ये अभिजीत बिचुकले आणि दिगंबर नाईक डेंजर झोनमध्ये गेले. महेश मांजरेकर यांनी घोषित केले की, या आठवड्यामध्ये दिंगबर नाईक यांना बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागणार आहे. आता येत्या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल? कोण घराचा नवा कॅप्टन बनेल? सदस्यांना कोणते टास्क मिळणार, हे बघणे रंजक असणार आहे.

Digamber Naik
दिगंबर नाईक

कालच्या भागामध्ये विणा आणि अभिजीत बिचुकले यांचा वाद झाला. तर 'शाळा सुटली पाटी फुटली' या टास्क मध्ये झालेल्या वादावरून देखील चर्चा झाली. यामध्ये प्रत्येकाने आपली मतं मांडली. या टास्कवरून नेहाला भाषेवरून महेश मांजरेकर यांनी सांगितले प्रत्येक विभागातील भाषेचा मान ठेवूया. अभिजीत केळकर याने देखील सांगितले नेहा चुकीचा गेम खेळत होती. तर, सुरेखा, पराग, वैशाली, दिगंबर यांचे तास छान झाले असे महेश मांजरेकर यांनी सांगितले. तर विश्वचषक सामन्याबद्दल देखील चर्चा झाली. सुरेखा पुणेकर यांनी कडक शब्दांत बिचुकले यांना खडसावले. घरातील सदस्य इतके खुश झाले की, त्यांनी गाणे म्हटले 'ही सुरेखा आम्हांला पटलेली आहे'.

घरामध्ये नुकतीच आयटम डान्सर हिना पांचाळ हिने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे. घरात नव्याने दाखल झालेल्या हीनावर बिग बॉसने तिच्यावर घरातील सदस्याला विशेषणांचा मुकुट घालण्याची जबाबदारी सोपावली. हिनाने तापट बिचुकले, कन्फ्युज माधव, बोलबच्चन नेहा, फटकळ विणा आणि डोकेबाज पराग अशाप्रकारे त्यांच्या घरातील वागणुकीनुसार मुकुट प्रदान दिले.

घरात नवीन सदस्यांची एन्ट्री झाल्याने घरातील समीकरण नव्याने बदलणार आहेत. त्यामुळे शिवांगीच्या जाण्यानंतर हिना आता या घरात कशी राहते. तसेच, घरातील सदस्यांशी जुळवून घेते की नाही ते पाहणं मोठं मनोरंजक ठरणार आहे.

Intro:बिग बॉसच्या घरातून शिस्तभंगाची कारवाई करत शिवानी सुर्वेला घराबाहेर काढल्यानंतर आता या दिगंबर नाईक हे या घरातून बेघर झालेत.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून मागील आठवड्यामध्ये मैथ्थिली जावकर घराबाहेर पडली. आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यामध्ये पराग काल सेफ झाला... नेहा शितोळे, विणा जगताप, किशोरी शहाणे, दिगंबर नाईक, माधव देवचके नॉमिनेशन होते ज्यामध्ये अभिजीत बिचुकले आणि दिगंबर नाईक डेंजर झोनमध्ये गेले. महेश मांजरेकर यांनी घोषित केले कि, या आठवड्यामध्ये दिंगबर नाईक यांना बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागणार आहे. आता येत्या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल ? कोण घराचा नवा कॅप्टन बनेल ? सदस्यांना कोणते टास्क मिळणार हे बघणे रंजक असणार आहे.

कालच्या भागामध्ये विणा आणि अभिजीत बिचुकले यांचा वाद झाला... तर शाळा सुटली पाटी फुटली या टास्क मध्ये झालेल्या वादावरून देखील चर्चा झाली, आणि प्रत्येकाने आपली मत मांडली. या टास्कवरून नेहाला भाषेवरून महेश मांजरेकर यांनी सांगितले प्रत्येक विभागातील भाषेचा मान ठेवूया. अभिजीत केळकर याने देखील सांगितले नेहा चुकीचा गेम खेळत होती फक्त शिव नव्हे तर प्रत्येक टास्कला तिने त्रास दिला... शिवने उत्तम उपाय काढला होता असे देखील तो म्हणाला. नेहाने देखील तिची बाजू मांडली. तर सुरेखा, पराग, वैशाली, दिगंबर यांचे तास छान झाले असे महेश मांजरेकर यांनी सांगितले. तर विश्वचषक सामन्याबद्दल देखील चर्चा झाली. तर सुरेखा पुणेकर यांनी कडक शब्दांत बिचुकले यांना खडसावले... घरातील सदस्य इतके खुश झाले कि, त्यांनी गाणे म्हंटले “ही सुरेखा आम्हांला पटलेली आहे”... तर महेश मांजरेकर म्हणाले तुम्ही बरोबर शाळा घेतली.

तर घरामध्ये नुकतीच आयटम डान्सर हिना पांचाळ हिने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे. घरात नव्याने दाखल झालेल्या हीनावर बिग बॉसने जबाबदारी सोपावली, ती घरातील सदस्याला विशेषणांचा मुकुट घालण्याची... हिनाने तापट – बिचुकले, कन्फ्युज माधव, बोलबच्चन नेहा, फटकळ विणा आणि डोकेबाज पराग अशाप्रकारे त्यांच्या घरातील वागणुकीनुसार मुकुट प्रदान दिले.

घरात नवीन सदस्यांची एन्ट्री झाल्याने घरातील समीकरण नव्याने बदलणार आहेत. त्यामुळे शिवांगीच्या जाण्यानंतर हिना आता या घरात कशी राहते. आणि घरातील सदस्यांशी जुळवून घेते की नाही ते पाहण मोठं इंटरेस्टिंग ठरणार आहे.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.