पणजी - जगात कोणालाच आपले घरदार सोडून जावे, युद्ध व्हावे असे वाटत नाही. परंतु आर्थिक आणि राजकीय परिस्थितीत असे घडताना दिसते. एकात्मतेच्या भावनेच्या अभाव तर दुसरीकडे राजकारण आणि धर्मांधता यामुळे जगभरात कमी अधिक प्रमाणात निर्वासितांचा प्रश्न गंभीरतेने वाढत आहे, असे मत 'डिस्पाईट ऑफ फॉग'चे दिग्दर्शक गोरान पास्कल्जेविक यांनी व्यक्त केले. 50 व्या भारतीय चित्रपट महोत्सवात त्यांचा हा चित्रपट शुभारंभी आज प्रदर्शित होणार आहे.
युरोपमध्ये एका लहान मुलाला निर्वासित झालेल्या कशाप्रकारे समस्येला सामोरे जावे लागते, या गंभीर विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. युरोपियन लोक निर्वासितांना मोठ्याप्रमाणात स्वीकारत नाहीत. हाच या चित्रपटाच्या कथानकाचा मुख्य भाग असून एक चित्रपट याविषयी खूप काही बोलतो, असेही गोरान पास्कल्जेविक यांनी सांगितले. राजकारण आणि धर्मांधता यामुळे एकात्मतेची भावना कमी होत आहे. ज्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी मदत होईल. जगभरात आजच्या घडीला हीच मोठी समस्या आहे, असेही ते म्हणाले.
तर अन्य एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, आम्ही आमच्या सजीवसृष्टीबाबत जागृत नाही. त्यामुळे भविष्याची चिंता वाटते. सुवर्णमहोत्सवी इफ्फीच्या शुभारंभासाठी माझ्या चित्रपटाची निवड केली याचा आनंद होत असून माझ्याकडून भारताला हे 'प्रेम पत्र' आहे. यावेळी चित्रपटातील कलाकार आणि निर्मात्या उपस्थित होत्या.