मुंबई - अभिनेत्री दीपिका पदुकोणने आपल्या आठवणींचा खजिना उघडला असून त्यातून एक जुना फोटो शेअर केलाय. तिच्या लहानपणीचा हा फोटो आहे, यात ती परिवारासोबत दिसत आहे. या फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे यात आमिर खानही बसलेला दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दीपिकाने आपला हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. यात तिने आपण १३ वर्षाची असल्याचे म्हटले आहे. याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ''१ जानेवारी २००० मधून मोठा थ्रोबॅक. मी १३ वर्षांची होते आणि लाजत होते.''
दीपिकाने पुढे आमिर खानबाबत लिहिलंय, ''तो लंच करीत होता. ठिक राहण्यासाठी दहीभात. नेहमीप्रमाणे मी भुकेलेली होते. परंतु त्याने ऑफर दिली नाही आणि मी विचारले नाही. #रैंडम #एनेक्डोट @_aamirkhan.''
या फोटोत आमिर आणि दीपिका यांच्या शिवाय तिचे वडिल प्रकाश पदुकोण आणि त्यांचे नातेवाईकही दिसत आहेत. अभिनेत्री दीपिका नेहमी आपले जुने फोटो शेअर करून चाहत्यांना सुखावत असते.