मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या 'छपाक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे टायटल ट्रॅकही अलीकडेच रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याच्या लाँचिंगदरम्यान दीपिकाने माध्यमांशी संवाद साधला. मात्र, दीपिकाला पत्रकारांनी रणवीरबाबत प्रश्न विचारल्यानंतर ती संतापलेली पाहायला मिळाली.
'छपाक'च्या टायटॅल ट्रॅक लाँचिंगचा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता. यावेळी मेघना गुलजार, विक्रांत मेस्सी, गुलजार, दीपिका, लक्ष्मी अग्रवाल आणि शंकर महादेवन हे उपस्थित होते. माध्यमांशी संवाद साधत असताना एका पत्रकाराने म्हटले, की दीपिकाने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच ती या चित्रपटाची निर्माती देखील आहे. त्यामुळे रणवीरनेही या चित्रपटाला पैसा लावला असेल. पत्रकाराचे हे बोलणे एकताच दीपिकाने लगेच प्रतिक्रिया दिली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -'छपाक'चं टायटल ट्रॅक प्रदर्शित, लॉन्च सोहळ्यादरम्यान लक्ष्मी अग्रवालसह दीपिकाही भावूक
'मला माफ करा, पण या चित्रपटात संपूर्ण पैसे मी लावले आहेत. सर्व माझ्या मेहनतीचे पैसे आहे'. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे होते.
यावेळी दीपिकाला इतरही प्रश्न रणवीरबाबत विचारण्यात येत होते. त्यामुळे ती काहीशी चिडली होती. तिने सरळ पत्रकारांना म्हटले, की 'तुम्ही असे कुठल्या कुठे प्रश्न का विचारत आहात? तुम्हाला भूक लागलीये का? जे काही विचारायचे असेल, ते सरळ विचारा'.
दीपिकाच्या उत्तराला मेघना गुलजार यांनीही समर्थन दिले. त्यादेखील शांतपणे म्हणाल्या, की 'रणवीरने पैसे लावले असतील, असं गृहीत धरणं चुकीचं आहे'.
'छपाक' हा चित्रपट १० जानेवारीला सिनेमागृहात झळकणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्वाचे ठरेल.
हेही वाचा -वरुण धवनने शेअर केले स्ट्रीट डान्सर गाण्याचे नवे पोस्टर