मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच 'छपाक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेस्सीदेखील यामध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ट्रेलरवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सध्या 'छपाक'ची टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अलिकडेच दीपिकाने एक खास संदेश देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आता 'मुंह दिखाई २.०' या व्हिडिओतून तिने 'छपाक'चा प्रवास उलगडला आहे.
दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनीही अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या पीडितांबद्दल आपला दृष्टीकोन बदलणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. अशा पीडितांमध्ये सेल्फ लव्ह (स्वत:बद्दलचे प्रेम) जागृत झाले पाहिजे, असा या व्हिडिओचा उद्देश आहे.
-
I see beauty in confidence,honesty and authenticity... presenting #MuhDikhai2.0https://t.co/KRNT8rwZFC#Chhapaak in cinemas on 10th January, 2020. @masseysahib @meghnagulzar @atikachohan @_KaProductions @MrigaFilms @foxstarhindi
— Deepika Padukone (@deepikapadukone) December 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I see beauty in confidence,honesty and authenticity... presenting #MuhDikhai2.0https://t.co/KRNT8rwZFC#Chhapaak in cinemas on 10th January, 2020. @masseysahib @meghnagulzar @atikachohan @_KaProductions @MrigaFilms @foxstarhindi
— Deepika Padukone (@deepikapadukone) December 27, 2019I see beauty in confidence,honesty and authenticity... presenting #MuhDikhai2.0https://t.co/KRNT8rwZFC#Chhapaak in cinemas on 10th January, 2020. @masseysahib @meghnagulzar @atikachohan @_KaProductions @MrigaFilms @foxstarhindi
— Deepika Padukone (@deepikapadukone) December 27, 2019
दीपिकाने हा व्हिडिओ शेअर करून खास कॅप्शनही दिले आहे. 'मी आत्मविश्वास, प्रामाणिकपणामध्ये सुंदरता पाहते', असे लिहून तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
३ मिनिट ४२ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये मेघना गुलजार या स्त्रीवादाचे समर्थन करताना दिसतात. या व्हिडिओमध्ये अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या ४ तरुणींची कथा दाखवली आहे.
हेही वाचा -'बदलना है', दीपिका - विक्रांतसोबत 'छपाक'च्या टीमने दिला प्रेरणादायी संदेश
'छपाक' हा चित्रपट अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या तरुणींवर आधारित आहे. अॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी अग्रवालची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
१० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
हेही वाचा -अॅसिड अटॅक पीडितांना बिच्चारीच्या नजरेतून पाहणे बंद करा - मेघना गुलजार