मुंबई - मराठी सिनेसृष्टीत आपल्या विनोदशैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे दादा कोंडके यांची बरीच गाणी तुफान लोकप्रिय ठरली आहेत. आजही त्यांच्या गाण्यांची क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. आता त्यांच्या अश्याच एका सुपरहिट गाण्याचा रिमेक करण्यात येणार आहे. अभिनेता आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीमगर्ल'मध्ये हे गाणं पाहायला मिळणार आहे.
दादा कोंडके यांचा लोकप्रिय 'बोट लावीन तेथे गुदगुल्या' या चित्रपटातील 'ढगाला लागली कळ' या गाण्याचे रिमेक तयार करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या पर्वावर या गाण्याला प्रदर्शित करण्यात येईल. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, 'ड्रीमगर्ल'चे दिग्दर्शक राज शांड्यल्य यांनी या गाण्याची लोकप्रियता पाहता, हे गाणे 'ड्रीमगर्ल'मध्ये वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
-
.@ayushmannk And @NushratBharucha To Dance On #DhagalaLagliKala In #DreamGirl#AyushmannKhurrana #NushratBharucha @ektaravikapoor @Ruchikaakapoor @writerraj @Thinkinkstudio @ZeeMusicCompany @meetbroshttps://t.co/NJYGJQI7MF pic.twitter.com/vEzi3kpfSU
— Urban Asian (@UrbanAsian) August 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">.@ayushmannk And @NushratBharucha To Dance On #DhagalaLagliKala In #DreamGirl#AyushmannKhurrana #NushratBharucha @ektaravikapoor @Ruchikaakapoor @writerraj @Thinkinkstudio @ZeeMusicCompany @meetbroshttps://t.co/NJYGJQI7MF pic.twitter.com/vEzi3kpfSU
— Urban Asian (@UrbanAsian) August 21, 2019.@ayushmannk And @NushratBharucha To Dance On #DhagalaLagliKala In #DreamGirl#AyushmannKhurrana #NushratBharucha @ektaravikapoor @Ruchikaakapoor @writerraj @Thinkinkstudio @ZeeMusicCompany @meetbroshttps://t.co/NJYGJQI7MF pic.twitter.com/vEzi3kpfSU
— Urban Asian (@UrbanAsian) August 21, 2019
आयुष्मान हा 'ड्रीमगर्ल' चित्रपटात अनोख्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरलाही चाहत्यांची भरभरुन पसंती मिळाली आहे. १३ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.