ETV Bharat / sitara

'दबंग ३' VS 'गुड न्यूज', अक्षय कुमारच्या चित्रपटांबाबत काय म्हणाला सलमान खान - box office collection of dabangg 3

'दबंग ३' चित्रपटाने पहिल्या दिवशी २४.५० कोटीची ओपनिंग केली होती. तर, गुड न्यूजने १७.५६ कोटीची ओपनिंग केली आहे.

Dabaang 3 vs Good Newwz: Salman Khan reacts to box office competition with Akshay kumar
'दबंग ३' VS 'गुड न्यूज', अक्षय कुमारच्या चित्रपटांबाबत काय म्हणाला सलमान खान
author img

By

Published : Dec 28, 2019, 12:51 PM IST

मुंबई - यंदा वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात बॉलिवूडच्या दोन मोठ्या अभिनेत्यांच्या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळतेय. सलमान खानचा 'दबंग ३' मागच्या आठवड्यात २० डिसेंबरला प्रदर्शित झाला. तर, अक्षय कुमारचा 'गुड न्यूज' हा २७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'दबंग ३' चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर 'गुड न्यूज' चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग केली आहे.

'दबंग ३' चित्रपटाने पहिल्या दिवशी २४.५० कोटीची ओपनिंग केली होती. तर, गुड न्यूजने १७.५६ कोटीची कमाई केली आहे. या दोन्ही चित्रपटांच्या शर्यतीबाबत सलमान खानला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा 'अक्षयच्या चित्रपटांनी माझ्या चित्रपटांपेक्षा जास्त कमाई करावी', असे तो म्हणाला. 'प्रत्येकाच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळावा, असे मला वाटते. अक्षय कुमारच नाही, तर, त्याच्या जागेवर शाहरुख किंवा इतर कोणाचाही चित्रपट असता, तरीही त्यांच्या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळावा', असे सलमान खान यावेळी म्हणाला.

अक्षय कुमारच्या चित्रपटांबाबत काय म्हणाला सलमान खान

हेही वाचा -भाईजानचा वाढदिवस, कॅटरिना कैफ, संगीता बिजलानीसह बॉलिवूडकर सहभागी

आता पुढच्या वर्षी देखील सलमान खानचा 'राधे' आणि अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बाँब' चित्रपटांमध्ये टक्कर पाहायला मिळेल.

सलमान खानने अलिकडेच त्याचा ५४ वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. त्याच्या 'दबंग ३' चित्रपटाने आठवडाभरात १२६.५५ कोटींची कमाई केली आहे.

हेही वाचा -Public Review : कसा आहे 'गुडन्यूज', जाणून घ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

Intro:Body:

salman khan

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.