ETV Bharat / sitara

कोरोना क्वीन : प्रिती झिंटाने २० वेळी दिली कोविड-१९ ची टेस्ट

author img

By

Published : Oct 21, 2020, 5:14 PM IST

अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आतापर्यंत २० वेळा कोरोना टेस्ट दिली आहे. प्रिती सध्या युएईमध्ये आयपीएल सामन्यांसाठी आहे. संघासोबत राहात असल्यामुळे दर ३ ते ४ दिवसांनी तिला कोरोना टेस्ट करावी लागत आहे.

Preity Zinta
प्रिती झिंटा

दुबई - बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने कोरोना टेस्ट केली आहे. या टेस्टमध्ये आपण तज्ज्ञ झाल्याचे तिने म्हटलंय. आयपीएलमध्ये 'किंग्ज इलेव्हन पंजाब'ला पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्री प्रिती सध्या युएईमध्ये आहे. प्रितीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कोरोना टेस्ट करताना दिसत आहे.

प्रतीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, मी कोरोना टेस्ट क्वीन बनले आहे. ही माझी २० वी कोरोना टेस्ट आहे.

अभिनेत्रीने पुढे व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "प्रत्येकजण मला विचारतो की आयपीएलच्या टीम बायो बबलमध्ये राहणे कसे असते. तर सांगते हे ६ दिवसांच्या क्वारंटाईनने सुरू होते. कोविड टेस्ट दर ३ते ४ दिवसांनी आणि बाहेर पडायचे नाही. फक्त आमची खोली, किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी ठरलेले रेस्टॉरंट, जीम आणि कारमधून स्टेडियम. ड्रायव्हर्स, शेफ सर्वजण बायो बबलमध्ये राहतात. म्हणून बाहेरून अन्न नाही, लोकांशी कोणताही संवाद नाही. तुम्ही जर माझ्यासारखी फ्री बर्ड असाल तर हे खूप कठीण आहे परंतु हे २०२० आहे. कोरोना साथीच्या काळात आयपीएलचे आयोजन झाले यातच खूश राहिले पाहिजे.''

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.