ETV Bharat / sitara

प्रभासच्या 'आदिपुरुष'ची अक्षयच्या सिनेमासोबत होणार बॉक्स ऑफिसवर 'टक्कर'!! - आनंद एल राय दिग्दर्शित, रक्षाबंधन

सिनेमा थिएटर्स सुरू होण्याबरोबरच मोठ्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्करही पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमारचा रक्षाबंधन आणि प्रभासची मुख्य भूमिका असलेला आदिपुरुष 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार होणार असल्यामुळे संघर्ष अटळ आहे.

बॉक्स ऑफिसवर 'टक्कर'!!
बॉक्स ऑफिसवर 'टक्कर'!!
author img

By

Published : Sep 27, 2021, 6:52 PM IST

मुंबई - अभिनेता अक्षय कुमारचा रक्षाबंधन आणि प्रभासची मुख्य भूमिका असलेला आदिपुरुष 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर सामना पाहायला मिळणार आहे.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ही बातमी ट्विटरवर शेअर केली आहे. त्यांनी लिहिले: "प्रभासचा 'आदिपुरुष' 11 ऑगस्ट 2022 ला रिलीज होईल."

दुसऱ्या ट्विटमध्ये आदर्श यांनी प्रभास आणि अक्षय यांच्या सिनेमांची टक्कर होणार असल्याचे लिहिले आहे.

गेल्या वर्षी ब्लॉकबस्टर 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा सिनेमा दिग्दर्शित केलेल्या ओम राऊतचा 'आदिपुरुष' हा चित्रपट आहे. या चित्रपटात सैफ अली खान आणि कृती सेनन यांच्याही भूमिका आहेत. आदर्श यांनी असेही लिहिले: "रक्षाबंधन '11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होईल. यात अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या भूमिका आहेत. स्वतंत्रता दिवसाच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा रिलीज होईल."

आनंद एल राय दिग्दर्शित, रक्षाबंधनची कथा हिमांशू शर्मा आणि कनिका डिलन यांनी लिहिली आहे आणि यात सहजमीन कौर, दीपिका खन्ना, सादिया खतीब आणि स्मृती श्रीकांत यांच्याही भूमिका आहेत.

हेही वाचा - शमिता शेट्टी आणि राकेश बापटचे रोमँटिक लाईव्ह सेशन, चाहत्यांच्या प्रश्नावर लाजली शमिता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.