रामनगर - बिदाडी जिल्ह्यातील जोगरापाल्याजवळ कन्नड चित्रपट 'लव यू राच्छू'चे शुटिंग सुरू होते. यावेळी झालेल्या शॉर्टसर्किटमुळे एका कलाकाराचा मृत्यू झाला आहे.
या घटनेत तामिळनाडूचा सिने फायटर (साहसी कलाकार) विवेकचा मृत्यू झाला आहे. अजय राव आणि रचिता राम यांच्या प्रमुख भूमिक असलेल्या 'लव यू राच्छू'चे या चित्रपटाचे शूटिंग या भागात चालू होते. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे दोन जण जखमी झाले आहेत तर एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. जखमी दोन्ही व्यक्तींवर बंगळूरूमध्ये उपचार सुरू आहेत.
गुरू देशपांडे यांची निर्मिती असलेला हा चित्रपट आहे. दिग्दर्शक विनोद या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असताना हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोर ओढताना हाय टेन्शन वायरमुळे या सिने फायटरचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना बिदाडी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून पोलीस घटनास्थळाची पाहणी करत आहेत.
हेही वाचा - 'तमाशा लाईव्ह'मध्ये असणार 30 गाणी, सोनाली कुलकर्णी दाखवणार जलवा