ETV Bharat / sitara

चित्रपट महामंडळाच्या 'चित्रभूषण' आणि 'चित्रकर्मी' पुरस्काराचे मुंबईत वितरण

विक्रम गोखले, लीला गांधी, भालचंद्र कुलकर्णी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

चित्रपट महामंडळाच्या 'चित्रभूषण' आणि 'चित्रकर्मी' पुरस्काराचे मुंबईत वितरण
author img

By

Published : Aug 20, 2019, 6:53 PM IST

मुंबई - चित्रपट क्षेत्रात आपले अमुल्य योगदान देणाऱ्या कलाकारांना देण्यात येणारा चित्रभूषण आणि चित्रकर्मी पुरस्काराचा वितरण सोहळा मुंबईत पार पडला. ३ वर्षाच्या अंतराने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विक्रम गोखले, लीला गांधी, भालचंद्र कुलकर्णी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आपले मत व्यक्त केलं. ते म्हणाले, 'चित्रपट क्षेत्रात आयुष्य घालवणाऱ्या चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ याच्या वाईट काळात मदत करण्यासाठी एका मंडतनिधींची उभारणी करण्याची गरज आहे'. विक्रम गोखले यांना चित्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि रोख ५० हजार, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मात्र, गोखले यांनी या पैशात आणखी भर घालून १ लाख १ हजार रुपयांची रक्कम पुन्हा महामंडळाला परत करून या कामाच्या निधी उभारणीसाठी मदत केली.

लीला गांधी, भालचंद्र कुलकर्णी यांना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लीला गांधी यांना पुरस्कार देण्यासाठी त्यांची मैत्रीण सुलोचना दीदी या सोहळ्यासाठी खास उपस्थित राहिल्या. तर, चित्रकर्मी पुरस्कारात दिग्दर्शक सुषमा शिरोमणी, अभिनेता सतीश पुळेकर, अभिनेत्री सविता मालपेकर, अभिनेते चेतन दळवी, अभिनेत्री उषा किरण, संगीतकार अच्युत ठाकूर, गायक विनय मांडके यांच्यासह ९ जणांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि ११ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

चित्रपट महामंडळाच्या 'चित्रभूषण' आणि 'चित्रकर्मी' पुरस्काराचे मुंबईत वितरण

यावेळी प्रथमच मराठी कलाकारांना वगळून मराठी सिनेसृष्टीत काम करणाऱ्या नृत्य दिग्दर्शकाना त्यांच्या चमूसह कला सादर करण्याची संधी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने दिली होती. सांगली आणि कोल्हापूर येथे पूरपरिस्थितीची कल्पना असल्याने अतिशय साधेपणाने हा कार्यक्रम पार पडला.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष सुशांत शेलार, संचालिका वर्षा उसगांवकर आणि चैत्राली डोंगरे याच्या अथक प्रयत्नाने हा सोहळा पार पडला. त्यांचे सर्वच पुरस्कार प्राप्त कलाकारांनी विशेष आभार मानले. या चौघांनाही लवकरात लवकर कलाकार आणि तंत्रज्ञ याना वैद्यकीय मदत देण्यासाठी लवकरात लवकर विशेष निधीची उभारणी करू, अशी ग्वाही उपस्थितांना दिली आहे.

Intro:चित्रपट क्षेत्रात आयुष्य घालवणाऱ्या चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ याच्या वाईट काळात मदत करण्यासाठी एका मंडतनिधींची उभारणी करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं. 'अखिल भारतीय चित्रपट महामंडळा'तर्फे देण्यात येणारा चित्रभूषण पुरस्कार यावर्षी गोखले याना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि 50 हजार रुपये अस या पुरस्काराचे स्वरूप आहे. मात्र गोखले यांनी या पैशात तेव्हढ्याच पैशाची भर घालून 1लाख 1 हजार रुपयांची रक्कम पुन्हा महामंडळाला परत करून या कामासाठी निधी उभारणीसाठी देऊ केली.

तीन वर्षांच्या अंतराने चित्रभूषण आणि चित्रकर्मी पुरस्कार सोहळा पार पडल्याने यावेळी विक्रम गोखले, लीला गांधी, भालचंद्र कुलकर्णी याना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. लीला गांधी यांना पुरस्कार देण्यासाठी त्यांची मैत्रीण सुलोचना दीदी या सोहळ्यासाठी खास उपस्थित राहिल्या. तर चित्रकर्मी पुरस्कारात दिग्दर्शक सुषमा शिरोमणी, अभिनेता सतीश पुळेकर, अभिनेत्री सविता मालपेकर, अभिनेते चेतन दळवी, अभिनेत्री उषा किरण, संगीतकार अच्युत ठाकूर, गायक विनय मांडके यांच्यासह नऊ जणांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि 11 हजार रुपये अस या पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी प्रथमच मराठी कलाकारांना वगळून मराठी सिनेसृष्टीत काम करणाऱ्या नृत्य दिग्दर्शकाना ताच्या चमूसह कला सादर करण्याची संधी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने दिली होती. सांगली आणि कोल्हापूर येथे पूरपरिस्थितीची कल्पना असल्याने अतिशय साधेपणाने हा कार्यक्रम पार पडला.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष सुशांत शेलार, संचालिका वर्षा उजगावकर आणि चैत्राली डोंगरे याच्या अथक प्रयत्नाने हा सोहळा पार पडला. त्यांचे सर्वच पुरस्कार प्राप्त कलाकारांनी विशेष आभार मानले. या चौघांनाही लवकरात लवकर कलाकार आणि तंत्रज्ञ याना वैद्यकीय मदत देण्यासाठी लवकरात लवकर विशेष निधीची उभारणी करू अशी ग्वाही उपस्थिताना दिली आहे.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.