ETV Bharat / sitara

"त्यांचे रस्ते छान आहेत, आपल्या रस्त्यावर मात्र खड्डे आहेत, त्यामुळे आपणच प्रश्न विचारले पाहिजेत"

२०१९ मध्ये सुध्दा आम्हाला चांगले रस्ते द्या यासाठी गयावया का करावी लागते? आपली प्रगती कशी होती हे याच्या रोज आपण जाहीराती, फ्लेक्स बघतोय. मग आम्हाला चांगले रस्ते का मिळत नाहीत ? असा सवाल चिन्मय मांडलेकरने विचारला आहे.

चिन्मय मांडलेकर
author img

By

Published : Sep 17, 2019, 6:07 PM IST

मुंबईचे खड्डे हा विषय सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सबंध शहरभर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झालंय. असे असले तरी शहरामध्ये एकही खड्डा नसल्याचे अजब वक्तव्य महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती यशवंत जाधव यांनी गेल्याच आठवड्यात केले होते. आता मराठी कलाकारांनी या विरुध्द जणू मोहिमच उघडली आहे. प्रशांत दामले, पुष्कर श्रोत्री यांच्यानंतर आता चिन्मय मांडलेकरनेदेखील खड्ड्यांच्या विरोधात आपला संताप व्यक्त केलाय.

चिन्मयने फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तो म्हणतो, ''मुंबईत राहणारा एक सामान्य नागरिक म्हणून मला काही बेसीक प्रश्न पडले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे २०१९ मध्ये सुध्दा आम्हाला चांगले रस्ते द्या यासाठी गयावया का करावी लागते? आपली प्रगती कशी होती हे याच्या रोज आपण जाहीराती, फ्लेक्स बघतोय. मग आम्हाला चांगले रस्ते का मिळत नाहीत ?''

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

पुढे चिन्मय म्हणतो, ''दुसरा प्रश्न रस्त्यावर पेव्हर ब्लॉक टाकण्याची कल्पना कुठल्या महाभागाने सुचवली. माझ्या माहितीनुसार पेव्हर ब्लॉक हे फुटपाथसाठी वापरले जातात. कारण जेव्हा एखादं जड वाहन रस्त्यावरुन जाते तेव्हा हा पेवर ब्लॉक उखडतो. बऱ्याचदा तो उडून मागच्या वाहनावर लागतो. माझ्या गाडीवर उडालेल्या पेव्हर ब्लॉक्सच्या खुणा आहेत. कारच्या ऐवजी मी जर बाईकवर असतो तर हाच पेव्हर ब्लॉक प्राणघातक ठरला असता. तेव्हा हे पेव्हर ब्लॉक आमच्यासाठी आहेत की त्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहेत. कारण दर २० दिवसांनी ते रस्त्याची कामे काढतात. तेव्हा इथे पैसे कोण खातंय आणि कोणाचा फायदा होतोय? मला वाटतं की हे प्रश्न राजकारण्यांना अधिकाऱ्यांना विचारण्याची आता वेळ आलीय, कारण आता अति झालंय.

''बंर, हे लोक कुठल्या रस्त्यावरनं प्रवास करतात माहित नाही कारण यांना खड्डे लागतं नाहीत. त्यांचे रस्ते छान आहेत. आपल्या रस्त्यावर मात्र खड्डे आहेत त्यामुळे आपणच प्रश्न विचारले पाहिजेत. माझ्यासारखी असंख्य अज्ञानी माणसं मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, वाशी इथं राहात आहेत. आता तरी त्यांनी समाज माध्यमावरनं का होईना प्रश्न विचारले पाहिजेत. कारण कुठलाही राजकीय नेता हे प्रश्न विचारणार नाही. आपणंच विचारुयात प्रश्न कारण आपले प्रश्न आपणच सोडवण्याची वेळ आली आहे.,'' असे चिन्मय मांडलेकरने आपल्या शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलंय.

पुष्कर श्रोत्रीनेही एक व्हिडिओ शेअर करीत आपला संताप व्यक्त केला आहे. तो म्हणतो, "मंत्रालय, पालिका मुख्यालय, वर्षा बंगला इथले रस्ते कधीच कसे खराब होत नाहीत मग आमच्याच घराजवळचे रस्ते कसे खराब होतात, याचाच अर्थ त्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाते. रस्ते बांधणीतला भ्रष्टाचार सर्वश्रुत आहेच, पण एकदाच काय खायचे ते पैसे खा पण चांगले रस्ते तेवढे बनवून द्या," अशी कडवट टीकाही त्याने या व्हिडीओ द्वारे केली आहे.

Intro:Body:

ent mar

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.